IND vs AUS 2nd Test 2020: टीम इंडियाने (Team India) मंगळवार, 29 डिसेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील (MCG) दुसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर (Australia) 8 गडी राखून विजय मिळवला. अॅडिलेड ओव्हलमधील पहिल्या सामन्यात अपमानजनक पराभवानंतर टीम इंडियाने कांगारू संघाला पराभवाचा दणका दिला मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. संघाने पहिल्या दिवसापासून मेलबर्न कसोटीवर (Melbourne Test) वर्चस्व राखले आणि यजमान संघाला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी 133/6 पासून पुन्हा खेळताना ऑस्ट्रेलिया संघ दिवसाच्या पहिल्या सत्रात 200 धावांवर ऑलआऊट झाला. कॅमरून ग्रीनने 45 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने तीन तर जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात सलामीवीर मयंक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या 5 धावा काढून माघारी परतला तर चेतेश्वर पुजारालाही आपली छाप पाडता आली नाही. (IND vs AUS 2nd Test 2020: मेलबर्न कसोटीमध्ये टीम इंडिया ‘अजिंक्यच’, ‘या’ प्रमुख 5 कारणांमुळे भारताने मालिकेत केले दिमाखात पुनरागमन)
पण, पदार्पणवीर शुभमन गिलच्या नाबाद 35 आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नाबाद 27 धावांच्या जोरावर संघाने 8 विकेटने ऐतिहासिक विजय नोंदवला. ट्विटरवरील क्रिकेट तज्ज्ञांनी बॉक्सिंग डे कसोटीत भारताच्या प्रबळ प्रदर्शनाचे तोंडभरून कौतुक केले. पाहा या प्रतिक्रिया:
सचिन तेंडुलकर
To win a Test match without Virat, Rohit, Ishant & Shami is a terrific achievement.
Loved the resilience and character shown by the team to put behind the loss in the 1st Test and level the series.
Brilliant win.
Well done TEAM INDIA! 👏🏻 #AUSvIND pic.twitter.com/64A8Xes8NF
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 29, 2020
विराट कोहली
What a win this is, absolutely amazing effort by the whole team. Couldn't be happier for the boys and specially Jinks who led the team to victory amazingly. Onwards and upwards from here 💪🇮🇳
— Virat Kohli (@imVkohli) December 29, 2020
वसीम जाफर
India winning the test at MCG against all odds.😊 #INDvAUS #AUSvIND pic.twitter.com/u6WLwT4Y3R
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 29, 2020
व्हीव्हीस लक्ष्मण
WOW!! Incredible comeback. What a win. Fine display of mental strength and character. Congratulations to each and every member of the Squad. @BCCI #INDvAUS
— VVS Laxman (@VVSLaxman281) December 29, 2020
वीरेंद्र सेहवाग
A really special win at the MCG.
Great Determination and great character. Rahane led from the fron,the bowlers were terrific and Gill is chill. pic.twitter.com/X3UO8H2LgR
— Virender Sehwag (@virendersehwag) December 29, 2020
हर्षा भोगले
This will go down as one of India's most memorable test wins. Winning a test in Australia is always special but to do so given the wounds of Adelaide and the absence of key players makes it one for the ages
— Harsha Bhogle (@bhogleharsha) December 29, 2020
अजित आगरकर
Well done India 🇮🇳...absolutely brilliant. Has to be one of the most impressive overseas win given the circumstances coming into this game 👏🏻👏🏻#AUSvIND
— Ajit Agarkar (@imAagarkar) December 29, 2020
दिनेश कार्तिक
Well done team India @BCCI. Never underestimate a wounded tiger 😉#AUSvIND pic.twitter.com/4kCHgRyW4i
— DK (@DineshKarthik) December 29, 2020
बिशन सिंह बेदी
Indns make it 1-All to silence the 4-0 OZ cry...nice to remain calm as @ajinkyarahane88 & deliver.There were a couple of hiccups on way to 8 Wkts triumph..but all’s well that ends well..this OZ batting is pretty average-read mediocre-so Indns can win the series..InshaAllah..!!
— Bishan Bedi (@BishanBedi) December 29, 2020
दरम्यान, टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीपुढे कांगारू संघाच्या तगड्या फलंदाजीनी गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाज धावा करण्यात असे अपयशी ठरले की दोन्ही डावात ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. दोन्ही डावात कागांरु संघ द्विशतकी धावसंख्या पार करू शकले नाही. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 195 धावा करता आल्या होत्या तर दुसऱ्या डावात 200 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघानं पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटी विजयासाठी भारतीय संघासमोर फक्त 70 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं जे त्यांनी 8 विकेट राखून गाठले.