IND vs AUS Series 2020-21: इंडियन प्रीमियर लीग 2020 यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर (India Tour of Australia) आहे. टीम इंडियाला (Team India) यजमान संघासह वनडे, टी-20 आणि कसोटी मालिका खेळायच्या आहेत. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना 27 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. सामना सुरू होण्यापूर्वी संघातील सर्व खेळाडू मैदानावर कसून सराव करत आहेत आणि संधी मिळाल्यावर मजाही करताना दिसत आहेत. संघातील अनेक खेळाडूंनी यापूर्वी सराव सत्राचा व्हिडिओ सामायिक केला आहे, परंतु आता संघाचा अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) युवा फलंदाज पृथ्वी शॉसमवेत (Prithvi Shaw) बॉलिवूड गाण्यावर आपला व्हिडिओ शेअर केला आहे. (IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली पडणार विक्रमांचा पाऊस, 'या' खास विक्रमांवर असेल डोळा)
धवन या व्हिडिओमध्ये शॉची छेड काढताना दिसत आहे. युवा भारतीय सलामीवीर फलंदाज पृथ्वीसह बॉलिवूडच्या जुन्या हिट गाणं सादर करतानाचा मजेदार व्हिडिओ धवनने इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना धवनने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'लैला अजूनही मला वेड लावत आहे'. पाहा धवन आणि शॉचा पोट धरून हसवणारा हा मजेदार व्हिडिओ
View this post on Instagram
सोमवारी धवन ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वपूर्ण दौर्याची तयारी करत असताना नेटमध्ये फलंदाजीचा सराव करतानाचा स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. “पुढील महत्त्वपूर्ण दौर्याची जोरदार तयारी सुरू आहे,” धवनने पोस्टला कॅप्शन दिले होते. आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीत धवन दुस्या क्रमांकाचा धावा करणारा होता. त्याने 17 सामन्यांत 618 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध टी-20 लीगमध्येही त्याने सलग दोनदा शतकं ठोकली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे, तीन टी-20 आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून धवन केवळ मर्यादित ओव्हरची मालिका खेळणार आहे कारण कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान भारताच्या वनडे संघात असलेला शॉ मर्यादित ओव्हरच्या संघात आपले स्थान कायम राखण्यात अपयशी ठरला. 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसह भारताचा डाऊन अंडर दौरा सुरू होणार आहे. या दौर्यामध्ये भारतीय संघ पहिल्यांदा विदेशी मैदानावर डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे.