ICC WTC Final 2021: फायनलपूर्वी मैदानाबाहेर रंगला दुसरा सामना, किवी खेळाडूंनी COVID-19 बायो-बबल नियम भंग केल्याची टीम इंडियाने ICC कडे केली तक्रार
न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

ICC WTC Final 2021: न्यूझीलंडच्या (New Zealand) काही खेळाडूंनी साउथॅम्प्टन (Southampton) येथे आयपीएल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship) सामन्यापूर्वी गोल्फ कोर्सला भेट दिल्याने भारतीय संघ (Indian Team) व्यवस्थापनाने बायो बबल (Bio-BUbble) प्रोटोकॉलवर प्रश्न उपस्थित केले. Cricbuzz च्या वृत्तानुसार, न्यूझीलंड संघाचे (New Zealand Team) सहा सदस्य जवळच्या गोल्फ कोर्सवर गेले होते, तर भारतीय खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय हॉटेलवर होते. अहवालानुसार न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (Trent Boult), टिम साउदी (Tim Southee), हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, डॅरेल मिशेल आणि फिजिओ टॉमी सिमसेक मंगळवारी सकाळी गोल्फ कोर्सला गेले होते. यानंतर भारतीय संघाच्या मॅनेजरने आयसीसीला (ICC) याबाबत माहिती देत म्हटले की टीम हे कार्य बायो-बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन मानते. (ICC World Test Championship: ट्रेंट बोल्टने WTC फायनल सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सहखेळाडूंविरुद्ध खेळण्यावर दिली मोठी प्रतिक्रिया)

आयसीसीच्या प्रोटोकॉलनुसार, भारतीय संघ आणि त्यांच्या कुटुंबीयांना हॉटेलमध्ये एक मजला देण्यात आला आहेत - परंतु त्याउलट न्यूझीलंडचे सदस्य गोल्फ खेळायला बाहेर गेले आहेत. आयसीसीने मात्र असे म्हटले आहे की यामुळे प्रोटोकॉलचे उल्लंघन झालेले नाही आणि आता भारतीय संघानेही आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे आणि ते देखील गोल्फ खेळण्यासह बायो बबलच्या आत राहून काहीही करू शकतात. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी मान्य झालेल्या आयसीसी मार्गदर्शक सूचनांनुसार भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी मंगळवारी आपल्या संघाची 15 सदस्यांची छाटणी केली आहे. भारत 25 सदस्यीय संघांसह इंग्लंडचा दौरा करीत आहे तर न्यूझीलंड 20 सदस्यांसह इंग्लंडमध्ये आहे.

टीम इंडियाने केएल राहुल, मयंक अग्रवाल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर यांना वगळले असून त्यांना आपल्या कुटुंबीयांसह लंडनला परत जाण्यास सांगण्यात आले आहे. दोन्ही संघांमधून वगळलेल्या सदस्यांना अंतिम 15 खेळाडूंसह राहण्यास परवानगी दिली जाणार नाही.