न्यूझीलंडचा (New Zealand) दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यात मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंविरुद्ध खेळण्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला आहे की जेव्हा तो मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसमोर येईल तेव्हा त्यांच्यात नक्की थट्टा-मस्करी होईल. साऊथॅम्प्टन (Southampton) मध्ये पोहोचल्यानंतर बोल्टने माध्यमांशी बोलताना आयपीएलच्या खेळाडूं विरोधात खेळण्याबाबत प्रतिक्रिया दिली. बोल्ट पुढे म्हणाला की, आयपीएलमुळे (IPL) न्यूझीलंडचे बरेच संघ खेळाडू आपल्या भारतीय क्रिकेटपटूंशी परिचित आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध खेळणे काहीसे वेगळे असेल. न्यूझीलंडचा संघ मंगळवारी साऊथॅम्प्टन येथे पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी दाखल झाला. 18 जूनपासून एजस बाउल येथे दोन्ही संघात जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. (ICC WTC Final 2021 NZ Likely Playing XI: विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल सामन्यासाठी ‘अशी’ असेल न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन)
“हे काही वेगळे आहे, (आम्ही पाहिले आहे) काही आयपीएल खेळाडू आणि खेळाडू ज्यांना आम्ही काही संघांमधून परिचित आहोत. मी अद्याप माझ्या मुंबई इंडियन्स सह खेळाडूंना पाहिलेला नाही आणि मला खात्री आहे की तेथे थोडीशी थट्टा-मस्करी होईल. अर्थात सामाजिक अंतरामुळे प्रत्येकजण आपले अंतर ठेवत ठेवून आहे आणि ही त्या अनोख्या परिस्थितींपैकी एक आहे,” बोल्टने म्हटले. पुढे ब्लॅककॅप्सचा वेगवान गोलंदाज बोल्टने मंगळवारी पुढे सांगितले की, इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील विजय हा अंतिम सामन्यात भारताविरुद्ध फारसा गणला जाणार नाही. एजबॅस्टन येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने यजमान इंग्लंडला आठ गडी राखून पराभूत केले आणि मालिका 1-0 अशी जिंकली. आता डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असलेल्या केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत सलामीवीर टॉम लाथमने संघाचे नेतृत्व केले होते.
New Zealand pacer Trent Boult is "eager to play a big part" in the inaugural ICC #WTC21 Final 👀 pic.twitter.com/EdyNg3VGuH
— ICC (@ICC) June 15, 2021
“मला असं वाटत नाही की हे जास्त प्रमाणात महत्वाचे आहे. चांगली तयारी आणि प्रत्येकासाठी बाहेर जाणे आणि थोडा वेळ घालवणे चांगले आहे,” दुसर्या कसोटी सामन्यात 6-119 च्या आकडेवारीसह स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा बोल्ट म्हणाला. इंग्लंडमध्ये उशिरा दाखल झालेल्या बोल्टला पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. 2 मे रोजी आयपीएल 2021 चा उर्वरित हंगाम स्थगित झाल्यावर बोल्ट इंग्लंडला जाण्याऐवजी मायदेशी परतला होता. बोल्ट पुढे म्हणाले, “या आठवड्याकडे लक्ष लपुन आहे, थांबू शकत नाही आणि आशा आहे की आम्ही आमच्या चांगल्या फॉर्मच्या जोरावर पुढे जाऊ.”