ICC WTC Final 2021 NZ Likely Playing XI: विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल सामन्यासाठी ‘अशी’ असेल न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारताविरुद्ध 18 जूनपासून साउथॅम्प्टनच्या एजस बाउल येथे होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल लढतीसाठी न्यूझीलंडने आपला अंतिम 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाशी दोन हात करण्यासाठी किवी संघात अनेक धाकड खेळाडूंचा समावेश झाला आहे ज्यामुळे कर्णधार विल्यमसनची प्लेइंग इलेव्हन निवड करण्याची डोकेदुखी देखील वाढली असेल.
ICC WTC Final 2021 NZ Likely Playing XI: भारताविरुद्ध (India) 18 जूनपासून साउथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल येथे होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) लढतीसाठी न्यूझीलंडने आपला अंतिम 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलेला केन विल्यमसन (Kane Williamson) पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत परतला आहे तर एजाज पटेल एकमात्र फिरकीपटू म्हणून संघात कायम आहे. तसेच कॉलिन डी ग्रँडहोम किवी संघाचा एकमेव अष्टपैलू आहे. टीम इंडियाशी (Team India) दोन हात करण्यासाठी किवी संघात अनेक धाकड खेळाडूंचा समावेश झाला आहे ज्यामुळे कर्णधार विल्यमसनची प्लेइंग इलेव्हन निवड करण्याची डोकेदुखी देखील वाढली असेल. अशास्थितीत आज आपण भारतीय संघाला (Indian Team) टक्कर देऊ शकेल अशा किवी संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घेणार आहोत. (ICC WTC Final 2021: फायनल सामन्यासाठी न्यूझीलंडचा अंतिम संघ जाहीर, Kane Williamson चे हे खेळाडू करणार टीम इंडियाशी दोन हात; पहा कोण IN कोण OUT)
उजव्या हाताच्या दुखापतीतून बरे होत विल्यमसन न्यूझीलंडचे आयसीसीच्या बहुचर्चित फायनल सामन्यात नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरेल. डेव्हन कॉनवे आणि टॉम लाथम किवी संघाची सलामी जोडी म्हणून सुरुवात करतील. कॉनवेने यापूर्वी लॉर्ड्स कसोटी सामन्यातून पदार्पण करत जबरदस्त द्विशतकी खेळी केली होती तर दुसऱ्या कसोटी सामन्यात किवी संघाचे यशस्वी नेतृत्व केलेला लाथमला दोन्ही सामन्यात प्रभावी कामगिरी बजावत आली नसली तरी तो दुसऱ्या सलामी जागेसाठी पहिली पसंती असेल. यानंतर कर्णधार विल्यमसन तिसऱ्या स्थानावरील जबाबदारी सांभाळेल. विल्यमसनला देखील इंग्लंड विरोधात पहिल्या सामन्यात अपेक्षेनुसार खेळी करता आली नाही. त्यामुळे फायनल सामन्यात तो आपला फॉर्म सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल. मधल्या फळीत रॉस टेलर, बी.जे. वॅटलिंग आणि हेन्री निकोल्स धावगती वाढवण्यासाठी मैदानात उतरतील. ग्रँडहोम अष्टपैलूची भूमिका बजावेल तर जेमीसन देखील बॅट व बॉलने भारताच्या अडचणीत वाढ करू पाहत असेल. दुसरीकडे, गोलंदाजी विभागात एजाज पटेल, टिम साउदी आणि ट्रेंट बोल्ट असतील. साउदी भारतीय कर्णधार विराट कोहली विरोधात सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
न्यूझीलंड WTC फायनल संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हन कॉनवे, टॉम लाथम, रॉस टेलर, बी.जे. वॅटलिंग (विकेटकीपर), हेन्री निकोल्स, कॉलिन डी ग्रँडहोम, काईल जेमीसन, एजाज पटेल, टिम साउदी, आणि ट्रेंट बोल्ट.
(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2021 11:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

