ICC WTC Final 2021: फायनल सामन्यासाठी न्यूझीलंडचा अंतिम संघ जाहीर, Kane Williamson चे हे खेळाडू करणार टीम इंडियाशी दोन हात; पहा कोण IN कोण OUT
न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

न्यूझीलंडने (New Zealand) साऊथॅम्प्टन (Southampton) येथे शुक्रवारी होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship_ स्पर्धेच्या पहिल्या फायनल सामन्यासाठी भारताविरुद्ध 15 सदस्यीय संघाची पुष्टी केली आहे. इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेत खेळलेल्या डग ब्रेसवेल, जेकब डफी, डॅरेल मिचेल, रचिन रवींद्र आणि मिचेल सॅंटनर  (Mitchell Santner) यांच्यासह पाच खेळाडूंना मूळ 20 सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहेत. कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) एकमेव अष्टपैलू संघात सामील झाला आहे तर विल यंग (Will Young) बॅटिंग कव्हर आणि इंग्लंड विरोधात दुसर्‍या कसोटीत दुखापतग्रस्त बी.जे. वॅटलिंगची जागा घेणारा टॉम ब्लंडेल अद्यापही बॅकअप म्हणून संघात कायम आहे. शिवाय, किवी संघाने स्पिनर म्हणून सॅटनरच्या जागी एजाज पटेलला पसंती दिली आहे. इंग्लंडविरुद्ध दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पटेलने चार विकेट्स घेतल्या. (ICC WTC Final 2021 Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता संघ होणार मालामाल, मिळणार तब्बल इतक्या कोटींची बक्षिस रक्कम)

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, “ज्यांनी संघाला बरेच काही दिले आहे अशांना निरोप देणे सोपे नाही.” स्टेड यांनी स्पष्ट केले की एजबॅस्टन येथे पटेलच्या प्रभावी कामगिरीने त्याच्या बाजूने निकाल लावला. “एजबॅस्टन येथे प्रभावी कामगिरीनंतर आम्ही एजाझला आमचा स्पिनर निवडले आहे आणि एजस बाऊलमध्ये तो एक महत्वाचा घटक ठरू शकेल असा आमचा विश्वास आहे,” स्टेड यांनी पुढे म्हटले. “बर्‍याच वर्षांपासून कॉलिन हा आमच्या कसोटी सेट अपचा अविभाज्य सदस्य होता आणि दीर्घ दुखापतीनंतर त्याला लॉर्डस् येथे पुनरागमन करताना पाहून आम्हाला आनंद झाला. तो वरच्या स्तरावर सिद्ध कलाकार आहे आणि गरज पडल्यास आम्ही त्याला फलंदाजी किंवा बॉलसह कामगिरी करण्यास पाठिंबा देतो,” त्यांनी पुढे म्हटले. कर्णधार केन विल्यमसन आणि निवृत्त वॅटलिंग यांच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडने विजय मिळवला पण स्टेड म्हणाले की, ही जोडी बरी झाली आहे आणि शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यात परतेल.

न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहॉम, मॅट हेन्री, काईल जेमीसन, टॉम लाथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॅटलिंग आणि विल यंग