BCCI Central Contracts List 2020-21: टीम इंडिया खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा; ‘हे’ खेळाडू होणार करोडपती, पहा संपूर्ण यादी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत टीम इंडिया (ज्येष्ठ पुरुष) साठी वार्षिक मानधन करार जाहीर केले आहेत. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मर्यादित ओव्हरमध्ये संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा ग्रेड ए+ मध्ये समावेश झाला आहे.