ICC World Cup 2019: सर्फराज अहमद आणि पाकिस्तानी संघाविरुद्ध कठोर कारवाई करा, कामरान अकमलची इम्रान खान कडे मागणी
(Photo Credit: Getty Image)

5 सामन्यात 1 विजय आणि 3 पराभवाच्या जोरावर पाकिस्तानी संघ ICC च्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. भारताकडून मिळालेल्या पराभवामुळे पाकिस्तान (Pakistan) च विश्वकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांचा पुढील सामना दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाशी 23 जूनला लॉर्ड्स (Lords) च्या मैदानात खेळाला जाईल. भटकडून झालेल्या निराशाजन पराभवाने चाहतेच नाही तर देशाचे माजी खेळाडू ही नाराज झालेले आहेत. शियाय त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहे. त्यांच्यात आता त्यांचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज कामरान अकमल (Kamran Akmal0 चे नाव ही समाविष्ट झाले आहेत. (World Cup 2019: 'Sarfraz तू जाडा आहेस', संतापलेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी फिटनेसवरुन केली कर्णधाराची 'टिंगल')

कामरान ने देशाचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यानां सर्फराज खान (Sarfraz Ahmed) आणि संघावर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. कामरान म्हणाला, 'पाकिस्तान ने दुसरी फलंदाजी करत एकही सामना जिंकला नाही. संघाने एकच सामना जिंकला, इंग्लंड (England) विरुद्ध, जेव्हा त्यांनी प्रथम फलंदाजी करत 300 पेक्षा जास्तीचा स्कोर केला तर वेस्टइंडीजविरुद्ध संघ 105 धावा करत अतिशय वाईटरित्या हरला. आपल्या फलंदाजीमुळे आपण वाईटरित्या फ्लॉप झालो, शिवाय आपण आपले सर्व सर्व दोष विरोधकांसमोर उघड करून दिले.'

'मी पंतप्रधान इम्रान खान यांना संघावर कठोर कारवाई करण्यासाठी विनंती करतो. आपल्याकडे नैसर्गिक क्रिकेटपटू आहे ज्यांची मेरीटवर निवड केल्यास पाकिस्तानी संघातील फलंदाजी आणि गोलंदाजीला बळकट करू शकतात आणि संघाला उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकतात.'

विश्वकपमध्ये आपली परंपरा कायम ठेवत, भारतीय संघाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला.कर्णधार सरफराज अहमदने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते.रोहित शर्मा, के.एल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पाकिस्तान ला सुधारित 40 षटकात 302 धावांचे आव्हान मिळाले. ते आव्हनही पाकला पेलवले नाही आणि पाकिस्तान 40 षटकांमध्ये केवळ 212 धावा करु शकला.