भारत (India) विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर पाकिस्तानी संघावर चहू बाजून टीका होत आहे. यंदातरी आपला आवडता संघ भारतावर विजय मिळवेल अशी चाहत्यांची अशा होती पण ही अशा धुळीत घालत विराट कोहली (Virat Kohli) च्या भारतीय संघाने आपल्या प्रतिस्पर्धी देशाचा अपमानकारक पराभव केला. या पराभवानंतर चाहत्यांनी कर्णधार सर्फराज अहमद (Sarfraz Ahmed) ला चांगलंय धारेवर धरलय. इतर खेळाडूं पेक्षा सर्फराज वर जास्तच टीका होत आहे. दरम्यान मॅचच्या काही दिवसांनी एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये सरफराज मैदानावर उभा असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही व्यक्तींने त्याला डिवचलं. सरफराज त्याच्याकडे रागाने वळून देखील बघितला, पण तो त्याला चिडवतच राहिला. या घटनेवेळी सरफराज कोच मिकी ऑर्थर सोबत उभा होता. (ICC World Cup 2019: भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्याकडून संघावर बंदीची मागणी, कोर्टात याचिका दाखल)
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. यात एक प्रशंसक "सर्फराज तू जाडा आहे", असे बोलताना ऐकू येतो. या व्हिडिओत, पाकिस्तानी पंतप्रधान आणि विश्वकप विजेता कर्णधार इम्रान खान (Imran Khan) ने सांगितल्या प्रमाणे टॉस जिंकून पहिले फलंदाजी का नाही घेतली, असेही चाहते विचारतायत.
Crowd trolling Pakistani captain.🤐 pic.twitter.com/YZMaGMs4bt
— Extremist 🇵🇰 (@hardcorefeminst) June 17, 2019
भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांमध्ये संतापाची लाट आहे. मॅन्चेस्टर (Manchester) मध्ये झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ/लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तान संघाला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या.