ICC World Cup 2019: भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्याकडून संघावर बंदीची मागणी, कोर्टात याचिका दाखल
(Photo Credit: Getty Image)

भारत (India) विरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते चांगलेच निराश झालेले आहे. पाकिस्तानी संघाच्या पराभवाचा इतका धक्का बसला आहे की एका चाहत्याने चक्क आपल्याच संघावर बंदी घालण्यासाठी कोर्टात याची दाखल केली आहे. विश्वकप मध्ये भारताने आपली परंपरा कायम ठेवत पाकिस्तानी (Pakistan) संघाचा दणदणीत पराभव केला. चाहत्याने संघ ऐवजी निवड समितीवरही बंदी घालण्याची मागणी याचिकेत केली आहे. (IND vs PAK, CWC 2019: केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या ट्विट वर पाकिस्तानचं प्रत्युत्तर, Stay Surprise म्हणत लगावला टोला

भारत विरुद्ध सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या खणखणीत 140 धावा; के. एल. राहुल (KL Rahul) च्या 57; कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या 77 धावांच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात शेवटी डकवर्थ लुईस (Duckworth/Lewis) नियमाप्रमाणे पाकिस्तानला सुधारित 40 षटकात 302 धावांचे आव्हान मिळाले. ते आव्हनही पाकला पेलवले नाही आणि पाकिस्तान 40 षटकांमध्ये केवळ 212 धावा करु शकला.

पाकिस्तानने विश्वचषकात 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. त्यांचा एक सामना रद्द झाला होता.