(Photo Credits: File Image)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) आज आयसीसी (ICC) विश्वकपमधील आपला अंतिम साखळी सामना खेळात आहे. हा सामना लीड्स (Leeds) च्या हेडिंग्ले (Headingley) मैदानात खेळाला जात आहे. या सामन्यात गोलांजांनी भारताला तुफानी सुरुवात करून दिली. यंदाच्या विश्वकपमध्ये पहिला सामना खेळात असलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने आपल्या 10 ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली. मॅचच्या 11व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडुवर जडेजाने कुसल मेंडिस (Kusal Mendis) ला बाद केले. जडेजाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात कुशल मेंडिसला एम एस धोनी (MS Dhoni) ने यष्टीचित केले. यावर एकीकडे सोशल मीडियावर जडेजाचे कौतुक होत आहे तिथे दुसरीकडे, संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी पुन्हा समालोचन करताना टेलर मेड पिच फॉर जडेजा असं म्हटलं. (IND vs SL World Cup 2019: अँजेलो मॅथ्यूज च्या शतकी खेळीसह, श्रीलंकाचे टीम इंडिया समोर 265 धावांचे लक्ष्य)

मांजरेकरांनी याआधी जडेजाच्या गोलंदाजीचं कौतुक न करता त्यांनी खेळपट्टी जडेजासाठी चांगली होती असं म्हटल्याने त्यांच्यावर निशाणा साधत ट्रोल केले जात आहे.

यंदा विश्वचषकच्या सुरुवाती पासूनच मांजरेकर स्वत:च्या वक्तव्यामुळे अडचणीत येत आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांवर चाहत्यांनी टीका केली आहे. काहींनी तर आयसीसी ला पत्र लिहून मांजरेकरांना समालोचन करण्यापासून हटवण्याची मागणी केली होती. याआधी धोनीवर देखील केलेल्या वक्तव्यावर अनेक युझर्स त्यांच्यावर नाराज आहेत.