भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) आज आयसीसी (ICC) विश्वकपमधील आपला अंतिम साखळी सामना लीड्स (Leeds) च्या हेडिंग्ले (Headingley) मैदानात खेळाला जात आहे. या सामन्यात श्रीलंकाने टॉस जिंकत प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. आपल्या 50 शतकात श्रीलंकाने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष दिले आहेत. श्रीलंकने 7 बाद 264 धावा केल्या. श्रीलंकासाठी माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने शतकी खेळी केली आणि 127 चेंडूत 113 करत बाद झाला. (IND vs SL सामन्यादरम्यान हेडिंग्ले स्टेडियमवर घिरट्या मारताना दिसला 'जस्टिस फॉर काश्मीर' बॅनर लावलेला हेलिकॉप्टर Video)
याआधी भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजांवर वर्चस्व बनवून ठेवले होते. यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने कर्णधार दिमुथ करूणरत्ने (Dimuth Karunaratne) ला स्वस्तात माघारी धाडले. सातव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने कुशल परेरा (Kusal Perera) ला माघारी धाडले. त्यानंतर विश्वकप 2019 मधील आपला पहिला सामना खेळात असलेल्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने कुशल मेंडिस (Kusal Mendis) ला बाद केले. तर पुढच्याच ओव्हरमध्ये अविष्क फर्नांडो (Avishka Fernando) देखील 20 धावा करून बाद झाला.
लवकर विकेट पडल्यानंतर मॅथ्यूज-लाहिरू थिरिमाने (Lahiru Thirimane) यांच्या सावध खेळीने श्रीलंकेला सावरले. मात्र, 37 ओव्हरमध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने मॅथ्यूज-थिरिमानेची जोडी फोडली. थिरिमाने 53 धावांवर बाद झाला. मॅथ्यूज आणि थिरिमाने यांच्या जोडीने शतकी भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. थिरिमाने बाद झाल्यानंतर मॅथ्यूजने 115 धावांत आपले शतक पूर्ण केले. भारतासाठी बुमराहने 10 ओव्हरमध्ये 37 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, टीम इंडियाच्या 'जबऱ्या फॅन' चारुलता पटेल (Charulata Patel), श्रीलंकेविरुद्धचा सामना पाहण्यासाठीही मैदानावर हजर आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या 87च्या या फॅन्सचे पिपाणी वाजवतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पिपाणीवाल्या आजींची भेट घेतली होती. विराटनं त्यांना श्रीलंकेविरुद्ध सामन्याची तिकीट भेट दिली आहे.