(Photo Credit/Getty Image)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये आज भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कर्णधार करूनारत्ने (Dimuth Karunaratne) याने टॉस जिंकत फंलदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी 4 विकेट्स घेत टीमला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, लीड्स (Leeds) च्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात एक गोष्ट अशी घडली की सर्वांची खळबळ उडाली. या सामन्यादरम्यान हेडिंग्ले स्टेडियमवर 'जस्टिस फॉर काश्मीर' (Justice For Kashmir) असे बॅनर लावलेला हेलिकॉप्टर घिरट्या मारताना दिसला. (IND vs SL सामन्यात हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांच्या असमन्वयामुळे Netizens संतापले, म्हणाले 'गली क्रिकेट खेलताहात का')

दरम्यान, हे हेलिकॉप्टर कोणाचे होते? त्यात कोण व्यक्ती बसली होती हे अद्याप समजले नाही. पण आयसीसी आणि स्थानिक पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घेत या विषयी चौकशी सुरु केली आहे. या प्रसंगामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण घाली आहे. विश्वकपध्ये हा असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. याआधी अफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यावेळी असं झालं होते. त्यावेळी आयसीसीने स्पष्टीकरण देत म्हणते होते की स्थानिक पोलिसांच्या मदतीने चौकशी सुरू असून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत.

याआधी देखील भारतीय संघ इंग्लंड (England) मध्ये असुरक्षित असल्याच्या बातम्या येत होत्या. भारतीय संघाने आयसीसीकडे सुरक्षेची मागणी केली होती, मात्र आयसीसीने यावर ठोस पाऊले उचलली नाही. इंग्लंडविरुद्ध सामन्या आधी काही चाहत्यांनी हॉटेलमध्ये दंगा केला होता. त्यानंतर भारतीय संघाने सुरक्षेची मागणी केली होती.