IND vs SL सामन्यात हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांच्या असमन्वयामुळे Netizens संतापले, म्हणाले 'गली क्रिकेट खेळताहात का'

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये आज भारत (India)-श्रीलंका (Sri Lanka) मध्ये अंतिम लढत होत आहे. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकत फंलदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकाविरुद्ध भारताने सुरुवाती पासून वर्चस्व बनवून ठेवले आहे. श्रीलंका संघाने 14 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 61 धावा केल्या आहेत. श्रीलंकेची सलामी जोडी दिमुथ करुणरत्ने (Dimuth Karunaratne) आणि कुशल परेरा (Kusal Parera) ने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, टीम इंडिया च्या यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ह्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. बुमराह ने कर्णधार करूनारत्नेला 10 धावांवर बाद केले. मात्र, नंतर गोलंदाजी करायला आलेल्या भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) च्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांच्या असमन्वयामुळे झेल घेता आली नाही. (ICC World Cup 2019: IND vs SL मॅचमध्ये जसप्रीत बुमराह याची शंभरी, वनडे क्रिकेटमध्ये घेतल्या 100 विकेट्स)

परेराने भुवनेश्वरच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या हेतूने चेंडू मारला. हार्दिक आणि कुलदीप मिड-ऑन च्या दिनेशेने धावत येऊन कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण असं काही केलं की वाटलं दोघे गली क्रिकेट खेळात आहे. एकमेकांना कोणी बघितले नाही, आवाजही नाही दिला. शेवटी बॉल कुलदीपच्या हातात आला पण त्याला हार्दिकचा धक्का लागल्याने बॉल त्याचा हातून निसटला. आणि नंतर दोघे एकमेकांना बघताच राहीले. हार्दिक आणि कुलदीपमधील असा असमन्वय सोशल मीडियावर चाहत्यांना अजिबात आवडला नाही आणि त्यांना ट्रोल करत म्हणाले की ही काई मजा चालली आहे. दरम्यान, हार्दिक आणि कुलदीपमधील असमन्वयामुळे परेराला केवळ 9 धावांवर असताना जीवनदान दिले होते.

मूर्ख पंड्या, गल्लीत खेळत आहे?

दरम्यान, बुमराहनं भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सातव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहनं कुशल परेराला माघारी धाडले. जडेजानं कुशल मेंडिसला बाद केले. तर पुढच्याच ओव्हरमध्ये अविष्क फर्नांडो बाद झाला.