ICC World Cup 2019: IND vs SL मॅचमध्ये जसप्रीत बुमराह याची शंभरी, वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा दुसरा भारतीय
(Photo Credit: Getty Image)

आयसीसी (ICC) विश्वचषकमध्ये आज भारत (India)-श्रीलंका (Sri Lanka) संघ आपला लीग स्टेजमधील शेवटचा सामना खेळात आहे. या सामन्यात श्रीलंका ने टॉस जिंकत फंलदाजीचा निर्णय घेतला. यापूर्वी बांगलादेश संघाला पराभूत करत टीम इंडिया ने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे श्रीलंकेचे विश्वकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, श्रीलंकाविरुद्ध सामन्यात भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आपल्या वनडे कारकिर्दीत शंभरी ओलांडली आहे. (IND vs SL मॅचआधी ICC ने शेअर केला एम एस धोनीसाठी स्पेशल व्हिडिओ, विराट कोहली सह या खेळाडूंनी केली प्रशंसा)

श्रीलंकाविरुद्ध मॅचमध्ये भारताला पहिले यश मिळवून देत बुमराहने 100 विकेट्सचा आकडा ओलांडला. बुमराहने कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne)याला 10 धावांवर बाद केलं. वनडेमध्ये सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा बुमराह हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. बुमराहने 57 सामन्यात 100 विकेट पूर्ण केल्या. तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने 56 सामन्यात 100 विकेट घेतल्या होत्या. तर, याशिवाय इरफान पठाण, जहीर खान, अजित आगरकर, जवागल श्रीनाथ यांनी भारतासाठी 100 विकेट घेतल्या आहेत.

श्रीलंकाविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यास, टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर येऊ शकते. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असेल. संध्याकाळी मॅन्चेस्टर येथे ऑस्ट्रेलिया (Australi) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात होणार आहे.