(Photo Credits: Twitter)

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) सध्या आपल्या खेळीने आयसीसी (ICC) विश्वचषकमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. टीम इंडिया ने बांग्लादेश (Bangladesh) संघाचा पराभव करत सेमीफाइनलचे तिकीट मिळवले आहे. टीमसाठी सलामीची जोडी रोहित शर्मा (Rohit Sharma)-के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने तुफानी खेळी केली आहे. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते धोनीच्या खेळीने. धोनीला यंदाचा विश्वकपमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही ज्यामुळे च्छते चांगलेच निराश झालेले दिसतायत. परिणामे, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या. (ICC World Cup 2019: विश्वचषकनंतर निवृत्तीच्या चर्चांवर एम एस धोनीचे स्पष्टीकरण, सांगितले यावेळी घेणार निवृत्ती)

दरम्यान, नुकतच धोनीने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम लावला. एबीपी न्यूज चॅनेल च्या पत्रकारांशी बोलताना धोनी म्हणाला, मी कधी निवृत्त होणार हे मलाच माहित नाही. पण, भारत विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) मॅचआधी आयसीसी ने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेट जगातमधील नामवंत खेळाडू, जोस बटलर (Jos Buttler), मोहम्मद शहजाद (Mohammad Shahzad) , आणि विराट, धोनीबद्दल आपापलं मत व्यक्त करत आहेत. आयसीसीने व्हिडिओ शेअर करताना लिहिले, "एक नाव ज्याने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला, एक नाव जे जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते, अविश्वसनीय विरासत असलेले नाव, एमएस धोनी - फक्त एक नाव नाही!"

यंदाच्या इंग्लड (England) मध्ये चालू असलेल्या विश्वचषकमध्ये धोनीच्या संथ खेळीमुळे त्याच्यावर टीका होत आहे. धोनीने 7 सामन्यांत 223 धावा केल्या आहेत आणि त्यात वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्धच्या नाबाद 56, एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. या विश्वचषकनंतर धोनीने निवृत्ती स्वीकारावी अशी अनेकांची मागणी आहे.