भारताचा माजी कर्णधार आणि 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या आपल्या निवृत्ती बाबत चर्चेचा विषय बनला आहे. आयसीसी (ICC) विश्वचषकमधील त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे धोनीने निवृत्ती घ्यावी, त्याच्यात पुर्वीसारखा खेळ राहिला नाही अशी टीका सर्वच स्तरातून होत आहे. त्यातच पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषक 2019 हा धोनीचा शेवटचा विश्वकप असेल अश्या बातम्या आल्या होत्या. त्यातच बीसीसीआय (BCCI) च्या एका अधिकाऱ्याने गौप्य स्पोट करत सांगितले की, "धोनी कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो. त्यानं देशासाठी खुप केलं आहे. याआधी त्यानं कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता कारण त्याला फलंदाजीवर लक्षकेंद्रित करायचे होते. सध्या वर्ल्ड कपमध्ये त्याचा फॉर्म चांगला आहे त्यामुळं तो निवृत्ती जाहीर करू शकतो". (ICC World Cup 2019: एम एस धोनी या कारणामुळे सतत बदलत आहे विश्वचषकात बॅट, निवृत्तीशी निगडित आहे कारण)
दरम्यान, या सर्व चर्चांवर एबीपी न्यूज (ABP News) चॅनलच्या एका पत्रकाराने धोनीला विचारले असता त्याने आपल्या या वृत्ताला साफ खोडून काढले. धोनी म्हणाला, "लोकांना वाटतं मी श्रीलंका (Sri Lanka) विरुद्धचा सामना खेळण्याआधीच निवृत्त व्हावे. मात्र मी कधी निवृत्त होणार हे मलाही माहित नाही".
सध्या चाहत्यांनी धोनीवर त्याच्या अपेक्षा भंग कामगिरीकर निशाणा साधत त्याच्या खेळीवर टीका होत आहे. इंग्लंड (England) विरोधात धोनीने 31 चेंडूत 42 धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते. बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध देखील धोनीला साजेशी कामगिरी करता आली नाही. धोनीने 33 चेंडूत 35 धावा केल्या, यात चार चौकारांचा समावेश होता. चाहते म्हणाले धोनी फिनीशर म्हणून खेळत नाही आहे.