How to Download Hotstar & Watch CSK vs MI Live Match: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (Photo Credits- File Photo)

CSK vs MI 41st IPL Match 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 41व्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना मर्यादित षटकारांचा उपकर्णधार मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात लढत होणार आहे. आयपीएल (IPL) 2020 मध्ये चेन्नईची कामगिरी आतापर्यंत फारशी खास राहिली नाही. परिस्थिती अशी आहे की चेन्नईचा संघ सात पराभव आणि अवघ्या तीन विजयांसह दहा सामन्यांनंतर 6 गुणांसह गुणतालिकेच्या तळाशी आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघ यंदादेखील शानदार प्रदर्शन करत आहे. या मोसमात आतापर्यंत मुंबई संघाने त्यांच्या नऊपैकी सहा सामने जिंकले आहेत, तर संघाला केवळ तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघ सध्या गुणांसह गुणांसह 12 गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून एकीकडे एमआय गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत करू पाहत असतील, तर एक पराभव प्ले-ऑफ गाठण्याचे सुपर किंग्सचे स्वप्न भंग करू शकते. (CSK vs MI IPL Head-to-Head: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज रंगणार महामुकाबला; जाणून घ्या आकडेवारी आणि रेकॉर्ड)

कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवली जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणारा आजचा सामना देखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत:

1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.