CSK vs MI IPL Head-to-Head: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज रंगणार महामुकाबला; जाणून घ्या आकडेवारी आणि रेकॉर्ड
इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या मोसमातील 41व्या सामन्यात तीन वेळा आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्जची इन-फॉर्म मुंबई इंडियन्सशी आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर लढत होणार आहे. या सीझनचा सलामीचा सामना या दोन संघांमध्ये खेळला गेला ज्यामध्ये सीएसकेने बाजी मारली. आजच्या या सामन्याआधी दोन संघांमधील प्रमुख आकडेवारी जाणून घ्या...
CSK vs MI IPL Head-to-Head: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या मोसमातील 41व्या सामन्यात तीन वेळा आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) इन-फॉर्म मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) लढत होणार आहे. हा हंगाम आतापर्यंत चेन्नईसाठी सर्वात वाईट हंगाम असल्याचे सिद्ध झाले आहे. परिस्थिती अशी आहे की टीम जवळपास प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. शेवटच्या सामन्यात चेन्नईची कामगिरी खूप निराशाजनक होती. सुपर किंग्सने त्यांचे 10 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत तर 7 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आत्तापर्यंत एकूण 6 सामने जिंकले आहेत. सुपर किंग्जसाठी हा डू किंवा डाय सामना आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने आणखी एक विजय मिळवून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याच्या निर्धारित असतील. (CSK vs MI, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)
या सीझनचा सलामीचा सामना या दोन संघांमध्ये खेळला गेला ज्यामध्ये सीएसकेने बाजी मारली. आजच्या या सामन्याआधी दोन संघांमधील प्रमुख आकडेवारी जाणून घ्या...
1. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमधील एकूण 31 सामने झाले आहेत, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने 18 तर चेन्नई सुपर किंग्जने 13 सामने जिंकले आहेत. या मोसमातील शेवटच्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा पराभव केला.
2. सध्याच्या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्यांचा कर्णधार रोहित शर्माने सीएसकेविरुद्ध सर्वाधिक 658 धावा केल्या आहेत.
3. चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांचा कर्णधार एमएस धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक 627 धावा केल्या आहेत.
4. सीएसकेविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून किरोन पोलार्डने 13, तर अष्टपैलू रवींद्र जडेजाने एमआयविरुद्ध सर्वाधिक 17 विकेट घेतल्या आहेत.
5. मागील सामना सोडून, एमआयने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अखेरचे 5 लढतींमधील सर्व सामने जिंकले आहेत.
दरम्यान, या मोसमात फलंदाजी ही चेन्नईची सर्वात मोठी समस्या आहे. कर्णधार धोनीने हे मान्य केले आहे की यंदाच्या मोसमात त्यांची फलंदाजी आणि फिल्डिंगही कमजोर आहे. फफ डू प्लेसिस हा एकमेव फलंदाज आहे जो धावा करत आहे. दुसरीकडे, मुंबईचा संघ संतुलित आहे. त्याचा फलंदाज आणि गोलंदाज दोघे फॉर्मात आहेत. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना चेन्नईने जिंकला. तो मोसमातील पहिला सामना होता, परंतु त्या सामन्यापासून चेन्नई आणि मुंबई दोन्ही संघांची स्थिती बदलली आहे. मुंबई गुणतालिकेत पहिल्या 4मध्ये तर सीएसके पॉईंट्स टेबलच्या तळाशी आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2020 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

