CSK vs MI, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (Photo Credit: File Image)

CSK vs MI, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या आवृत्तीचा 41वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला जाईल. स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येतील. पहिल्यांदा दोन्ही संघात टूर्नामेंटचा सलामीचा सामना रंगला होता ज्यात सीएसकेने (CSK) बाजी मारली. सध्या गुणतालिकेत चेन्नई आठव्या क्रमांकावर आहे तर मुंबई तिसर्‍या स्थानावर आहे. सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार आज, 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 दरम्यान एमएस धोनीच्या कर्णधारपदावर CSK मॅनेजमेन्ट नाराज, 2021 पूर्वी ‘डॅडीज आर्मी’च्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना दाखवतील बाहेरचा रास्ता- रिपोर्ट)

13 व्या मोसमातील दोन्ही संघांचा प्रवास पूर्णपणे वेगळा राहिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई संघाने आतापर्यंत 10 पैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत.मात्र, सीएसकेने मुंबईविरुद्ध या स्पर्धेचा पहिला सामना जिंकला. इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामातील सुपर किंग्जची मोहीम दिवसेंदिवस खराब होत चालली आहे आणि आज शारजाह येथे होणाऱ्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांच्या काही युवा खेळाडूंना युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे.

पाहा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघ

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), दिग्विजय देशमुख, क्विंटन डी कॉक, आदित्य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नॅथन कोल्टर-नाईल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, क्रुणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, राहुल चाहर, क्रिस लिन, हार्दिक पांड्या, शेरफने रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिशेल मॅकक्लेनाघन, प्रिंस बलवंत राय सिंह, अनुकूल रॉय, ईशान किशन.

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कप्तान), मुरली विजय, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, रुतुराज गायकवाड, केदार जाधव, रविंद्र जडेजा, पीयूष चावला, मिशेल सॅटनर, मोनू कुमार, सॅम कुरन, एन जगदीशन, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, जोश हेजलवुड, आर साई किशोर.