File Image of Sourav Ganguly (Photo Credits: Twitter @SGanguly99)

Happy Birthday Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि तमाम क्रिकेट चाहत्यांचा 'दादा' अर्थातच सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा आज (8 जुलै 2018) 47 वाढदिसव. अनेक आजीमाजी क्रिकेटपटू आणि क्रिडा रसिकांनी सौरव गांगुली याच्यावर शुभेच्छांचा वर्षव केला आहे. सोशल मीडियावर तर त्याला शुभेच्छा आणि त्याच्या खास व्हिडिओंची चांगलीच लाट पाहायला मिळत आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत सौवर गांगुली आपली खेळी आणि आक्रमक स्वभाव दोन्ही मुळे चर्चेत राहिला. असं सांगितलं जातं की, सौरव गांगुली यानेच भारतीय क्रिकेट संघाला मैदान आणि मैदानाबाहेर दादागिरी करायला शिकवले. मुळात फुटबॉल चाहता असलेला सौरव गांगुली आपला भाऊ स्नेहाशीष गांगुली याच्यामुळे क्रिकेटमधला डावखुरा फलंदाज फलंदाज ठरला. असा हा 8 जुलाई 1972 मध्ये कोलकाता येथे जन्मलेला सौरव गंगुली आज 47 वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिसानिमित्त जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

सौरव भावामुळे झाला डावखुरा

सौरव गांगुली याचा आक्रमक स्वभाव त्याच्या चाहत्यांना भावला. त्यामुळे त्याचे चाहते त्याला 'गॉड ऑफ ऑफसाइड', 'प्रिंस ऑफ कोलकाता', 'बंगाल टाइगर' आणि 'दादा' नावाने संबोधतात. भारतीय क्रिकेट संघातील तो डावखुरा फलंदाज होता. असे सांगितले जाते की, सौरव गांगुली सुरुवातीला उजव्या हाताने खेळत असे. परंतु, त्याचा भाऊ स्नेहाशीष हा डावखुरा होता. त्याच्यासोबत क्रिकेट खेळताना त्याला अडचण येत होती. त्यामुळे सौरवनेही स्वत:ला डावखुरा करुन घेतले.

सौरव फुटबॉलचा फॅन

सौरव गांगुली याला फुटबॉल प्रचंड आवडतो. इतका की त्याचा सुरुवातीचा आवडता खेळ फुटबॉलच होता. मात्र, त्याचा भाऊ स्नेहाशीष याच्याकडून त्याने क्रिकेट खेळण्याची प्रेरणा घेतली. विशेष असे की, बंगाल रणजी ट्रॉफीमध्ये सौरवने आपला भाऊ स्नेहाशीष याची जागा घेतली. (हेही वाचा, ICC Cricket World Cup 2019: माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी सांगितले- भारतीय संघाला इंग्लंडमध्ये 'या' खेळाडूची कमतरता जाणवेल)

लॉर्ड्समध्ये शतकी खेळी

सौरव गांगुली याने 1992 मध्ये डेब्यु केला. पदार्पणापासूनच तो आपल्या आक्रमक खेळी आणि स्वभावासाठी ओळखला जात असे. अॅटीट्यूडच्या कारणामुळे ब्रिसबेनमध्ये त्याला ड्रॉप करण्यात आले होते. त्यानंतर त्याला 1996 मध्ये टेस्ट सीरीजसाठी निवडण्यात आले. त्याने लॉर्ड्समध्ये शतकी पदार्पण केले होते. कोणत्याही भारतीय खेळाडूकडून या मैदानावर केलेला हा अंतिम स्कोर होता.

दिग्गज लोक प्रेरणास्थान

डेविड गावर, डेविड बून, मोहिंदर अमरनाथ, कपिल देव आणि एलेन बॉर्डर या मंडळींची नावं आपले प्रेरणास्थान म्हणून सौरव गांगुली मोठ्या प्रेमाने उच्चारतो. तर, वेस्टइंडीजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा हा त्याचा आवडता कर्णधार आहे.

एकदिवसीय सामन्यात धावा करण्याऱ्या दिग्गजांपैकी एक

दादा नावाने क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुली याने 113 टेस्ट सामन्यांमध्ये 7,212 धावा केल्या. तर, 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 22 शतकांच्या मदतीने 11,363 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांत धावा करण्यात जगभरातील दिग्गज फलदाजांमध्ये गांगुलीचे नाव घेतले जाते. सन 2000 ते 2005 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 21 टेस्ट सामने जिंकले.