‘IPL च्या पैशाने आमच्या मैत्रीत विष घोळलं’, ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या कर्णधारासोबत मैत्री संबंध तुटण्यावर Andrew Symonds ने मौन सोडले
अँड्र्यू सायमंड्स (Photo Credit: Instagram)

Andrew Symonds-Michael Clarke: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सने (Andrew Symonds) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सुरुवातीपासूनच माइकल क्लार्क (Michael Clarke) सोबतचे नाते बिघडले असल्याचा दावा केला आहे. 2008 मध्ये, आता खारीज झालेल्या डेक्कन चार्जर्सने (Deccan Chargers) 1.8 अमेरिकी दशलक्षमध्ये सामील केल्यानंतर सायमंड्स हा सर्वात महागडा खेळाडू बनला होता. चार्जर्सने सायमंड्ससह व्हीएस लक्ष्मण, अॅडम गिलख्रिस्ट, शाहिद आफ्रिदी आणि हर्शल गिब्स यांच्यासह स्टार खेळाडूंचा समावेश केला होता. आयपीएलच्या (IPL) उद्घाटनाच्या आवृत्तीत त्याने कमावलेल्या मोठ्या रकमेमुळे ईर्ष्या निर्माण झाली आणि क्लार्कसोबतच्या त्याच्या संबंधात अडथळा निर्माण केला असे या अनुभवी खेळाडूला असे वाटले.

“आम्ही जवळ झालो. जेव्हा तो (क्लार्क) संघात आला तेव्हा मी त्याच्यासोबत खूप फलंदाजी करायचो. म्हणून जेव्हा तो बाजुला आला तेव्हा मी त्याची काळजी घेतली. यामुळे एक बंधन निर्माण झाले,” ब्रेट ली पॉडकास्टवर सायमंड्सने उद्धृत केले. “मॅथ्यू हेडन मला म्हणाला - जेव्हा आयपीएल सुरू झाली तेव्हा मला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी एक चांगला पैसा मिळाला होता - त्याने ते ओळखले कारण तिथे (क्लार्कसोबत) नातेसंबंधात थोडी ईर्ष्या आली होती. “पैसा मजेदार गोष्टी केली. ही चांगली गोष्ट आहे परंतु ते एक विष असू शकते आणि मला वाटते की यामुळे आमच्या नातेसंबंधात विषबाधा झाली असावी,” सायमंड्स म्हणाले. “मला त्याच्याबद्दल पुरेसा आदर आहे की जे काही सांगितले गेले त्याबद्दल कदाचित तपशीलात जाऊ नये. माझी त्याच्याशी मैत्री आता राहिली नाही आणि मी त्यात सोयीस्कर आहे, पण मी इथे बसून चिखल उडवणार नाही,” सायमंड्स पुढे म्हणाले.

आयपीएल 2008 मध्ये सायमंड्सच्या खेळीबद्दल बोलायचे त्याने फक्त चार सामने खेळले, जिथे तीन डावात 80.50 च्या सरासरीने आणि 153.33 च्या स्ट्राइक रेटने 161 धावा केल्या. यामध्ये त्याने राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध नाबाद 117 धावांचा देखील समावेश आहे. याशिवाय चार्जर्स व्यतिरिक्त सायमंड्सने मुंबई इंडियन्स संघासाठी देखील 39 आयपीएल सामन्यांमध्ये 36.07 च्या सरासरीने एक शतक आणि पाच अर्धशतकांसह 974 धावा केल्या. तसेच त्याने 7.67 च्या इकॉनॉमी रेटने 20 विकेट्सही घेतल्या. दुसरीकडे, क्लार्कने आयपीएल 2012 मध्ये फक्त सहा सामने खेळले होते आणि पुणे वॉरियर्सचे प्रतिनिधित्व केले होते. पाच वर्षानंतर 2015 मध्ये क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद काबीज केले.