New Zealand National Cricket Team vs England National Cricket Team, 2nd Test Day 3 Scorecard: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला गेला. दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंड संघाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. या मालिकेत टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करत आहे. तर इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. (हे देखील वाचा: SA W vs ENG W 2nd ODI Match 2024 Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार रोमांचक सामना, येथे जाणून कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह मॅच)
तत्पूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 43 धावांवर संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर हॅरी ब्रूक आणि ऑली पोप यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. इंग्लंडचा पहिला डाव 54.4 षटकांत 280 धावांवर आटोपला.
Series won with a game to spare ✅
England's biggest win by runs against New Zealand!https://t.co/FUY1BFka5o | #NZvENG pic.twitter.com/hUU3aLQ1DT
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 8, 2024
इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 115 चेंडूत 11 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 123 धावांची तुफानी खेळी केली. हॅरी ब्रूकशिवाय ओली पोपने 66 धावा केल्या. दुसरीकडे, मॅट हेन्रीने न्यूझीलंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नॅथन स्मिथशिवाय विल्यम ओरूर्कने तीन आणि मॅट हेन्रीने दोन बळी घेतले. न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात आघाडी घ्यायला आवडेल.
पहिल्या डावात फलंदाजीला आलेला न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 34.5 षटकात केवळ 125 धावांवरच गारद झाला. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 53 धावा करून संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने सर्वाधिक 37 धावांची खेळी खेळली. केन विल्यमसनशिवाय कर्णधार टॉम लॅथमने 17 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंड संघाने 155 धावांची आघाडी घेतली होती. गस ऍटकिन्सनने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून ब्रेडन कार्स आणि गस ऍटकिन्सन यांनी प्रत्येकी सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ब्रेडेन कार्स आणि गुस ऍटकिन्सन यांच्याशिवाय ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने 82.3 षटकात 427 धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 582 धावांचे डोंगरासारखे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या नऊच्या धावसंख्येवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. यानंतर जेकब बेथेल आणि बेन डकेट यांनी मिळून डाव सांभाळला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 106 धावांची खेळी खेळली. जो रूटशिवाय जेकब बेथेलने 96 धावा केल्या. मॅट हेन्रीने पुन्हा एकदा न्यूझीलंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि टिम साऊदी यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. मॅट हेन्री आणि टीम साउथी यांच्याशिवाय विल्यम ओ'रूर्क आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 59 धावा करून संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 54.2 षटकात अवघ्या 259 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून टॉम ब्लंडेलने शानदार शतक झळकावले. या उत्कृष्ट खेळीदरम्यान टॉम ब्लंडेलने 102 चेंडूत 13 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 115 धावा केल्या. टॉम ब्लंडेलशिवाय नॅथन स्मिथने 42 धावा केल्या.
ख्रिस वोक्सने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. बेन स्टोक्सशिवाय ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 14 डिसेंबरपासून हॅमिल्टन येथील सेडॉन पार्क येथे खेळवला जाईल.