Moeen Ali (Photo Credit: ANI)

इंग्लंडच्या संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मोईन अली हा कालच श्रीलंकेत (Sri Lanka) दाखल झाल्याचे कळत आहे. कोरोनाचा अहवाल आल्यानंतर त्याला दहा दिवसांसाठी क्वारंटाईन केले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांना सेल्‍फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात दोन कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सराव सामन्याच्या आधीच ही मालिकेला स्थगिती देण्यात आली होती. ज्यामुळे एकही सामना न खेळता इंग्लंडचा संघ आपल्या मायदेशात परतला होता.

इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौर्‍यावर आहे. इंग्लंड आणि श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या संपूर्ण दौऱ्यावर मोईन अलीची महत्वाची भुमिका होती. परंतु, मोईन अलीला कोरोनाची लागण झाली असून तो दहा दिवसांसाठी क्वारंटाईन आहे. यामुळे मोईन अली याच्या जागेवर कोणत्या खेळाडूला संधी देण्यात येईल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हे देखील वाचा IND vs AUS 2020-21: SCG मध्ये टीम इंडियाचा 'द वॉल' राहुल द्रविडने एक धाव घेताच प्रेक्षकांनी उभं राहून वाजवल्या होत्या टाळ्या, पहा Video

ट्विट-

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 14 जानेवारी खेळला जाणार आहे. यामुळे मोईन अली पहिल्या सामना मुकण्याचे अधिक शक्यता आहे. पण त्यानंतर दुसरा कसोटी सामना 22 जानेवारी खेळला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात मोईल अली खेळण्याची दाट शक्यता आहे.