Dinesh Karthik Birthday Special: निदाहास ट्रॉफीमध्ये अखेरच्या चेंडूवर सिक्स मारून मिळवला थरारक विजय, वाढदिवसानिमित्त रोहित शर्मानेही मानले आभार
रोहित शर्मा, दिनेश कार्तिक (Photo Credit: Getty)

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने (Dinesh karthik) भारतासाठी (India) बरीच कामगिरी केली होती पण निदाहास ट्रॉफीच्या अंतिम क्षणात केलेल्या खेळीने त्याला खरोखरच लोकांच्या आठवणीत स्थान मिळवले आहे. तेव्हा आश्चर्य नाही की रोहित शर्माने 2 वर्षांपूर्वी त्या चकित करणाऱ्या खेळीची आठवण काढली. निदाहास ट्रॉफीचा (Nidahas Trophy) तो हिरो, दिनेश आज 35 वर्षांचा आहे. यष्टिरक्षक पार्थिव पटेल स्टम्पच्या मागे अयशस्वी झाल्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये विकेटकिपर म्हणून स्थान देण्यात आले होते. 5 सप्टेंबर 2004 रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्याला टीम इंडियामध्ये नियमितपणे स्थान मिळाले नसले तरी तो आयपीएलमधील दिल्ली, पंजाब, आरसीबी, मुंबई, गुजरात आणि कोलकाता संघांचा भाग होता, नंतर त्याला केकेआरचा कर्णधार बनविण्यात आले. निदाहास ट्रॉफी 2018 च्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या बॉलवर भारताला विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने शानदार षटकार ठोकून भारताला विजेतेपद मिळवून दिले. या शॉटसाठी नेहमीच तो चाहत्यांच्या लक्षात राहील. (#DhoniRetires ट्रेंडला विरोध करणारं 'ते' ट्विट डिलीट करण्याचं साक्षी धोनी ने सांगितलं कारण, लॉकडाउननंतर एमएस धोनीचा प्लॅन केला उघडकीस)

त्याच शॉटची आठवण काढत भारताच्या मर्यादित षटकारांचा उपकर्णधार रोहितने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिनेशच्या 35 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन रोहितने निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अविस्मरणीय खेळी केल्याबद्दल आभार मानले. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहितने निदाहास ट्रॉफीमध्ये भारताचे नेतृत्व केले होते.

पाहा डिकेसाठी रोहितची खास पोस्ट

 

View this post on Instagram

 

Happy birthday Dk baba. Thanks for that last ball six 👌@dk00019

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

निदाहास ट्रॉफी श्रीलंकामध्ये खेळली गेली. या तिरंगी मालिकेत बांग्लादेशचाही समावेश होता. फायनलमध्ये बांग्लादेशविरुद्ध कार्तिक खेळपट्टीवर येण्यापूवी भारत दडपणाखाली आला होता. कार्तिकने येताच जबरदस्त शॉट्स मारून भारताला प्रसिद्ध विजय मिळवून दिला. त्यानंतर दिनेशचा भारताच्या 2019 वर्ल्ड कप टीममधेही समावेश करण्यात आला होता. उपांत्य फेरीत भारत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर निवड समितीने दिनेश कार्तिककडे मागे वळून पाहिले नाही.