काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर #DhoniRetires असं ट्रेंड सुरु करण्यात आलं होतं. 2019 वर्ल्ड कप सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळल्या भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्या निवृत्तीचा विषय गेली अनेक महिने चर्चेत राहिला आहे. धोनीने स्वतः यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याने आणि सोशल मीडियावर असा ट्रेंड सुरु झाल्याने धोनीच्या चाहत्यांचा मात्र गोंधळ उडाला. गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेल्या चर्चा पुन्हा सुरु झाल्याने धोनीची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) भडकली आणि लॉकडाउनमध्ये लोकांचे मानसिक स्वस्थ बिघडले असल्याचं तिने ट्विट केलं, पण नंतर ते डिलीट केले. आणि तिने असं का केलं याबाबत एका लाईव्ह मुलाखतीत तिने खुलासा केला. साक्षीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या अधिकृत हँडलवरील इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रादरम्यान तिच्या ट्विटबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आले असताना सांगितले. (#DhoniRetires पुन्हा ट्विटरवर ट्रेंड झाल्याने भडकली साक्षी धोनी; अफवा पसरवणाऱ्यांची केली बोलती बंद, ट्वीट नंतर केले डिलीट)
ट्विट डिलीट करण्यामागचं कारण सांगताना साक्षी म्हणाली,"मी आणि माही ट्विटरवर कोणत्याही बातमी जास्त पाहत नाही. त्या दिवशी तो हॅशटॅग ट्रेंड झाला आणि माझ्या एका मैत्रिणीने मला मेसेज पाठवला की काय चालले आहे? नंतर मला काहीतरी झालं आणि मी ट्विट केलं आणि तो पर्यंत मला जे सध्या करायचे होते ते झाले होते म्हणून नंतर मी ट्विट डिलीट केलं." पाहा साक्षीने डिलीट केलेलं ट्विट:
दुसरीकडे, लॉकडाउननंतर क्रिकेट सुरु न झाल्यास माही आणि तिने डोगरांवर जाण्याची योजना आखली आहे. साक्षी म्हणाली की त्यांनी उत्तराखंडला जायचे ठरविले आहे, छोट्या गावात राहू. आम्ही सुरक्षित असलेल्या रस्त्याने जाऊ आणि विमानाने जाणार नाही. दरम्यान, धोनीच्या भविष्याच्या वाटचालीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. धोनी आयपीएलमधून क्रिकेट मैदानावर पुनरागमन करणार होता, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने त्याचे पुनरागमन लांबणीवर गेले.