सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिकेट विश्वातील महान खेळाडूंपैकी एक आहे. टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या इतक्या धावा अन्य कोणत्याही फलंदाजाने केल्या नाहीत. मात्र, सचिनला कारकिर्दीच्या सुरुवातीला फार संघर्ष करावा लागला. करिअरच्या सुरुवातीला सचिन मधल्या फळीत फलंदाजी करायचा आणि एका सामन्या दरम्यान डावाची सुरुवात करण्यासाठी त्याला चक्क भीक मागायला लागला. याचा खुलासा खुद्द मास्टर-ब्लास्टरने केला. सचिन मधल्याफळीत फलंदाजी करत जास्त यशस्वी झाला नाही. त्यानंतर, 1994 मध्ये न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर त्याने पहिल्यांदा डावाची सुरुवात केली आणि त्यानंतर वनडेमध्ये रेकॉर्ड शतकं ठोकली. सचिनने एका मुलाखती दरम्यान या दौऱ्यावरील एक मजेदार किस्सा सांगितलं की कशा प्रकारे त्याला ओपनिंग फलंदाज बेण्यासाठी भीक मागावी लागली. माजी फलंदाज नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना दुखापत झाल्यानंतर सचिनला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्याचा पूर्ण फायदा करून घेतला. (सचिन तेंडुलकर नाही 'या' महिला क्रिकेटरने वनडेमध्ये ठोकले होते पहिले दुहेरी शतक)
तेंडुलकर म्हणाला, "मी सकाळी हॉटेल सोडल्यावर मला माहित नव्हतं की मी डावाची सुरुवात करणार आहे. आम्ही मैदानावर पोहोचलो आणि अझर आणि वाडेकर सर ड्रेसिंग रूममध्ये होते. ते म्हणाले की, सिद्धू फिट नाही आहे तर कोण डावाची सुरुवात करेल. मी सांगितले की मी करेन. माझा स्वत:वर पूर्ण विश्वास होता की मी त्या गोलंदाजांवर आक्रमण करू शकतो." तो म्हणाला, "त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की मला डावाची सुरुवात का कार्याची आहे? पण माझा असा विश्वास आहे की मला शक्य आहे. मी तिथे जाऊन स्लॉट शॉट खेळून परत येईन असं नव्हतं. मी माझा सामान्य खेळ चालू ठेवेल जो आक्रमक फलंदाजी आहे. पण मला या संधीसाठी भीक मागावी लागली. मी म्हणालो मी अयशस्वी झाल्यास मी पुन्हा तुझ्याकडे येणार नाही." सचिनने त्या सामन्यात 49 चेंडूत 82 धावा केल्या.
सचिन म्हणाला, त्या खेळीनंतर त्याला डावाची सुरूवात करण्यासाठी विचारण्याची गरज पडली नाही, ते त्याच्याकडूनच ओपनिंग करून घेत. यानंतर सचिन वनडे संघाचा नियमित सलामी फलंदाज बनला.