पुरुष क्रिकेट लोकप्रियतेत महिला क्रिकेटपेक्षा खूप पुढे असेल तरी महिला क्रिकेटपटू (Women's Cricketer) विक्रमी खेळी करण्यात पुरुषांना कडक स्पर्धा देत आहे. क्रिकेट हे टेनिस सारखे नाही जिथे महिलांना पुरुषांप्रमाणेच चांगली वागणूक आणि आदर केला जातो. क्रिकेट (Cricket) हा प्रामुख्याने पुरुष खेळ आहे जो आजही महिलांचे क्रिकेट वाढविण्यासाठी आवश्यक त्या प्रकारच्या पुढाकार घेऊ शकलेला नाही. 1934 मध्ये प्रथमच महिलांची कसोटी सामना सुरू होत असतानाही, अजूनही ते प्रासंगिकतेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी लढत आहेत ही बाब महिलां क्रिकेटमधील सर्वात दु:खद आहे. यातही सर्वात निराश करणारी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक महिला क्रिकेटर्सने पुरुषांपेक्षाखी आधी असे अनेक रेकॉर्ड नोंदवले आहे, पण तरीही त्यांना क्षमते इतके लक्ष वेधू शकले नाही. (On This Day: आजच्या दिवशी सचिन तेंडुलकरने झळकावले आयपीएलमधील पहिले शतक, कोची टस्कर्स केरळविरुद्ध केली कमाल)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 'हे' 5 विक्रम दिग्गज पुरुष क्रिकेटपटूंआधी महिलांनी नोंदवले आहेत. आणि हो हे जाणून तुम्हाला नक्की आर्श्चय होईल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक
सचिन तेंडुलकर एकदिवसीय स्वरूपात शतक ठोकणारा पहिला पुरुष खेळाडू आहे. पण, क्रिकेटच्या इतिहासातील पहिले द्विशतक झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावावर आहे. सचिनच्या 13 वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 1997 रोजी बेलिंडाने महिला विश्वचषकात डेन्मार्कविरुद्ध 229 धावांची खेळी केली होती.
वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या 400 धावा
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा महिला संघानेच 400 धावांचा टप्पा गाठला होता. 1997 च्या विश्वचषकात न्यूझीलंडने 220 व्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 455 धावा केल्या. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 434 धावा केल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेने 8 विकेट गमावून 438 धावा करून सामना जिंकला.
कसोटी सामन्यात 100 धावा आणि 10 विकेट
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यात शतक आणि 10 पेक्षा जास्त विकेट मिळवण्याचा विक्रम बेटी विल्सनच्या नावावर आहे. बेटीने फेब्रुवारी 1958 मध्ये मेलबर्न येथे इंग्लंडविरुद्ध 112 धावा केल्या आणि 16 धावांवर 11 गडी बाद केले होते. दुसरीकडे, एलन डेविसन त्यांनी दोन वर्षानंतर 1960 मध्ये पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला. इयान बॉथम आणि इमरान खानचाही या लिस्टमध्ये समावेश आहे. दरम्यान, एनिड बेकवेल हा पराक्रम करणारी फक्त दुसरी महिला क्रिकेटर आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक सलग विजय
इंग्लंडच्या महिला संघाने सलग 14 टी -20 पेक्षा कमी सामने जिंकले आहेत. 30 ऑक्टोबर 2011 ते 15 सप्टेंबर, 2012 दरम्यान महिला टीमने हा विक्रम नोंदवला. पुरुष क्रिकेटमध्ये सलग टी-20 विजय मिळविणारा संघही इंग्लंडचा आहे, ज्यांनी 6 मे, 2010 12 जानेवारी 2011 पर्यंत सलग 8 सामने जिंकले होते.
टी-20 क्रिकेटमध्ये पहिले पाच विकेट
टी-20 स्वरूपात प्रथमच महिला विकेट्सने पाच विकेट घेतल्या होत्या. 2007 च्या विश्वचषकात न्यूझीलंडच्या एमी सरदरवेटने 17 धावा देऊन पाच गडी बाद केले होते. दोन वर्षांनंतर 2009 मधील पुरुष टी-20 विश्वचषकात उमर गुलने पाच विकेट्स घेतल्या होत्या.
आजही महिला क्रिकेटपटू आपल्या खेळाने प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेक्षकांची जास्ती पसंती मिळत नसली तरी या महिला क्रिकेटर्स अनेक विक्रमांना गवसणी घालत आहे आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्रिकेटमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.