On This Day: आजच्या दिवशी सचिन तेंडुलकरने झळकावले आयपीएलमधील पहिले शतक, कोची टस्कर्स केरळविरुद्ध केली कमाल (Watch Highlights)
सचिन तेंडुलकर आयपीएल शतक (Photo Credit: Instagram)

आजच्या दिवशी 2011 मध्ये 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या कोची टस्कर्स केरळविरुद्ध (Kochi Tuskers Kerela) सामन्यात टूर्नामेंटमधील त्याचे पहिले शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये असंख्य शतक झळकावणाऱ्या सचिनच्या नावर आयपीएलमध्ये फक्त एक शतक आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सचिनने खेळलेल्या सहा मोसमात काही शानदार खेळी साकारल्याआहेत. यात त्याने एकूण 13 अर्धशतक आणि एका शतकासह 34.83 च्या सरासरीने एकूण 2,334 धावा केल्या आहेत. आयपीएलमधील सचिनने पाहिलं आणि खरच शतक 9 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कोची टस्कर्सविरुद्ध केलं. सचिनने कोची टस्कर्सविरुद्ध 66 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या.मुंबई इंडियन्सने आयपीएल 2011 ची जोरदार सुरुवात केली. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचे त्यांचे पहिले दोन सामने जिंकले होते. मात्र, कोची टस्कर्सविरुद्ध या सामन्यात मुंबईला 8 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले होते. (On This Day: 25 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सचिन तेंडुलकर बनला वनडेमध्ये 3000 धावा करणारा सर्वात युवा फलंदाज)

वानखेडे मैदानावर सचिनने हा इतिहास रचला होता. याच मैदानावर टीम इंडियाने फक्त दोन आठवड्यांपूर्वी श्रीलंकेचा पराभव केला आणि दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकला होता. सचिनने अंबाती रायुडूसोबत 116 धावांची भागीदारी केली आणि मुंबईने 182 धावांची मजबूत धावसंख्या उभारली. रायुडूने 53 धावा केल्या. पण या कोचीने ब्रेंडन मॅक्युलमच्या जबरदस्त 81 धावा केल्या आणि संघाने 2 गडी गमावून 184 धावांचे लक्ष गाठले.

यापूर्वी सचिनने 99 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली होती पण आयपीएलमधील हे त्यांचे पहिले शतक होते. यापूर्वी केवळ मनीष पांडे, युसुफ पठाण, मुरली विजय, पॉल वथाती यांनी शतकं ठोकली होती. दुसरीकडे, सचिन आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला कर्णधारही ठरला.