On This Day: 25 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सचिन तेंडुलकर बनला वनडेमध्ये 3000 धावा करणारा सर्वात युवा फलंदाज

25 वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी सचिनने वनडेमध्ये 3000 धावा करण्याचा सर्वात युवा फलंदाज म्हणून इतिहास रचला. 1995 शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये त्याने श्रीलंकाविरुद्ध पराक्रम गाजवला होता. सचिनने 22 व्या वाढदिवसाच्या 15 दिवसांपूर्वी 3000 धावांचा शिखर सर्वात कमी वयात गाठला.

On This Day: 25 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सचिन तेंडुलकर बनला वनडेमध्ये 3000 धावा करणारा सर्वात युवा फलंदाज
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)हा खेळाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय वनडे (ODI) आणि कसोटी क्रिकेटमध्येदिग्गज फलंदाजांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहेत. आणि आजचा दिवस सचिनच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा मानला जातो. 25 वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी सचिनने वनडेमध्ये 3000 धावा करण्याचा सर्वात युवा फलंदाज (Youngest Cricketer) म्हणून इतिहास रचला. 1995 शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेमध्ये त्याने श्रीलंकाविरुद्ध पराक्रम गाजवला होता. पहिले फलंदाजी करत श्रीलंकाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 202 धावा केल्या. त्यांचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. हसन तिलकरत्नेने सर्वाधिक 48 धावा केल्या. व्यंकटेश प्रसादने भारताकडून सार्वधिक 3, जावगल श्रीनाथने 2 विकेट घेतल्या तर मनोज प्रभाकर आणि अनिल कुंबळे प्रत्येकी 1 गडी बाद केला. (World Cup 2011 फायनलबाबत सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सहवाग यांचा मोठा खुलासा, फायनलमध्ये रणनीती बदलल्याचे केले उघडकीस)

श्रीलंकाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सचिन आणि प्रभाकरला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली आणि भारताला विजयाच्या जवळ नेले. प्रभाकर 60 धावा करून बाद झाले, पण सचिनने टिकून फलंदाजी केली आणि शतक ठोकले. तो 112 धावा करून नाबाद परतला आणि 16.5 ओव्हर शिल्लक असताना भारताने विजय मिळवला. शिवाय, शारजाह स्टेडियममधील ते सचिनचे पहिले शतक होते. सचिनच्या डावात 15 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या शतकाच्या जोरावर सचिनने 22 व्या वाढदिवसाच्या 15 दिवसांपूर्वी 3000 धावांचा शिखर सर्वात कमी वयात गाठला.

दरम्यान, सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 463 एकदिवसीय सामने खेळले आणि 44.83 च्या सरासरीने 18,426 धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये सचिनच्या शतकांचे अर्धशतक फक्त एकाने हुकले. त्याने वनडे कारकिर्दीत एकूण 49 वनडे शतकं केली आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2020 09:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).