CSK vs PBKS Head to Head: पंजाब किंग्ससमोर असणार चेन्नई सुपर किंग्जचे तगडे आव्हान, आकडेवारीत कोण असणार वरचढ; घ्या जाणून
CSK vs PBKS (Photo Credit - X)

CSK vs PBKS, IPL 2024: आयपीएल 2024 चा 49 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात बुधवार, 1 मे रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. (हे देखील वाचा: CSK vs PBKS, IPL 2024 Live Streaming: आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यांत होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना)

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात आतापर्यंत 28 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत चेन्नई सुपर किंग्स संघाने 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्ज संघाने 13 सामने जिंकले आहेत. या मोसमात प्रथमच दोन्ही संघांमध्ये टक्कर होणार आहे. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात 1 सामना खेळला गेला होता. पंजाब किंग्जने हा सामना जिंकला होता. आयपीएल 2022 मध्ये दोन्ही संघांनी 2 सामने खेळले आणि दोन्ही सामने पंजाब किंग्जने जिंकले.

एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघांची आकडेवारी कशी आहे?

चेन्नई सुपर किंग्जने एमए चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 69 सामने खेळले आहेत. या काळात चेन्नई सुपर किंग्जने 49 सामने जिंकले असून 19 सामने गमावले आहेत. या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जची सर्वोत्तम धावसंख्या 246 धावा आहे. पंजाब किंग्जने या मैदानावर 9 सामने खेळले आहेत. या कालावधीत पंजाब किंग्ज संघाने 3 सामने जिंकले असून 5 सामने गमावले आहेत. पंजाब किंग्जनेही या मैदानावर 1 सामना टाय केला आहे. या मैदानावर पंजाब किंग्जची सर्वोत्तम धावसंख्या 201 धावा आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवन दुबे, समीर रिझवी, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, रिले रौसो, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल.