CSK vs PBKS, IPL 2024: आयपीएल 2024 चा 49 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात बुधवार, 1 मे रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.
It's the clash of two in-form teams at the Chepauk 🏟️ ⚔️
Which Kings will rise to the occasion? Watch #CSKvPBKS tonight from 6:30 PM, LIVE with #IPLonJioCinema, streaming FREE 👈#TATAIPL | @ChennaiIPL | @PunjabKingsIPL pic.twitter.com/nWtukAqaJP
— JioCinema (@JioCinema) May 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)