AUS vs NZ: नॅथन लायन याने केली माखाया एनटीनी याची बरोबरी, न्यूझीलंडचा 3-0 ने क्लीन-स्वीप करत ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका
नॅथन लायन (Photo Credit: Twitter/ICC)

सिडनी क्रिकेट मैदानावर सोमवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) न्यूझीलंडला (New Zealand) 279 धावांनी पराभूत करत मालिका 3-0 ने जिंकली. दुपारच्या जेवणानंतर यजमानांनी 217 धावांवर दुसरा डाव घोषित केला घोषित केली आणि ब्लॅक कॅप्सला विजयासाठी 416 धावांचे मोठे लक्ष्य दिले. डेव्हिड वॉर्नरने नाबाद शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबूशेन 59 बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 2 बाद 217 धावांवर घोषित केला. वॉर्नर 111 धावांवर नाबाद परतला. हे त्याचे टेस्ट करिअर मधील 24 वे तर मालिकेतील पहिले शतक ठरले. पण, ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरलं फिरकी गोलंदाज नॅथन लायन (Nathan Lyon). लियोनने दुसऱ्या डावात 50 धावांवर 5 गडी बाद केले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याच्या 25 धावांवर 3 विकेटच्या सहाय्याने लायनने खराब होणार्‍या खेळपट्टीवर प्रभावी खेळी आणि आणि सामन्यात एकूण 10 गडी बाद केले. लियोनने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत सर्वाधिक 19 गडी बाद केले आणि अग्रगण्य ठरला. (AUS vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला ठोठावला दंड, संतप्त डेविड वॉर्नर याने अंपायरच्या निर्णयाचा केला विरोध, पाहा Video)

यासहा लायनने सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माखाया एनटीनी (Makhaya Ntini) याची बरोबरी केली. लायन आणि एनटिनीने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 390 गडी बाद केले आहेत. एनटिनीने 190 डावात तर लायनने 184 डावात हा टप्पा गाठला. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन रेकॉर्ड 800 विकेटसह अव्वल स्थानावर आहे. लायनच्या निशाण्यावर आता कर्टली एम्ब्रोस असतील ज्यांनी एकूण 405 टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे तर, यात न्यूझीलंडचा रॉस टेलर याने 22 धावा फटकावून टेस्टमध्ये 7,174 धावा केल्या आणि माजी किवी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांना पछाडत न्यूझीलंडचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज बनला. किवी संघाच्या डावात कॉलिन डिग्रॅंडोलम याच्या 52 धावांचा डाव सर्वात मोठा होता. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या तिसर्‍या दिवशीन्यूझीलंडविरुद्धला पहिल्या डावात 251 धावांवर ऑल आऊट केले. यजमानांनी न्यूझीलंडचा फॉलोऑन दिला नाही आणि दुसऱ्या डावात 217 धावांवर डाव घोषित केला. पहिल्या विकेटसाठी वॉर्नर आणि बर्न्सने 107 धावांची भागीदारी केली आणि दुसर्‍या विकेटसाठी वॉर्नरने लाबुशेनबरोबर 110 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत क्लिन स्वीप करत 40 टेस्ट चँपियनशिप गुण मिळवत 10 सामन्यांत 296 गुणांसह दुसर्‍या स्थानावर स्थान मिळविले आहे.