AUS vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला ठोठावला दंड, संतप्त डेविड वॉर्नर याने अंपायरच्या निर्णयाचा केला विरोध, पाहा (Video)
अलीम दार डेविड वार्नर (Photo Credit: Twitter/cricketcomau)

यजमान ऑस्ट्रेलियाने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये सुरु असलेल्या तिष्य आणि अंतिम टेस्ट सामन्यात न्यूझीलंडवर वर्चस्व कायम ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पर्थ आणि मेलबर्न सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घातली होती आणि आता यजमान न्यूझीलंडचा क्लीन-स्वीप केला. ऑस्ट्रेलिया (Australia)-न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान अंपायर आणि त्यांचे निर्णय चर्चेचा विषय बनले होते. सोमवारी, तीन चेंडूंदरम्यान दोनदा चेंडूच्या खेळपट्टीच्या मध्यभागी धाव घेतल्याने अंपायर अलीम डार (Aleem Dar) यांनी पाच धावांचा दंड ठोठावला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सोमवारी एक धाव घेताना मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) आणि त्यानंतर डेविड वॉर्नर (David Warner) खेळपट्टीच्या मध्यभागी धावले, ज्यामुळे अम्पीरांनी ऑस्ट्रेलियन संघाला पाच धावांचा दंड ठोठावला. सामन्यात यजमान संघाची स्थिती बरीच मजबूत आहे, त्यामुळे पाच धावांच्या दंडामुळे त्यांना फारसे नुकसान झाले नाही. (AUS vs NZ: रॉस टेलर याची ऐतिहासिक खेळी, स्टीफन फ्लेमिंग याला पछाडत बनला न्यूझीलंडचा सर्वाधिक टेस्ट धावा करणारा फलंदाज)

दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाला पाच धावांची पेनल्टी मिळाली, जेव्हा वॉर्नर एकेरी धाव घेण्यासाठी खेळपट्टीच्या मध्यभागी धावला. तथापि, त्याच्या अगोदर लाबूशेनला अंपायरने अशी धाव न घेण्याचा इशारा दिला होता. नियमानुसार, गोलंदाजांसारखे फलंदाजांना खेळपट्टीच्या मध्यभागी म्हणजे 'संरक्षित क्षेत्रात' धावायचे असते. विकेटच्या संवेदनशील भागाला हानी पोहोचू नये या कारणाने असे केले जाते. लाबूशेनला चेतावणी मिळाल्याच्या दोन चेंडूनंतर वॉर्नरने मॅट हेन्री याच्या चेंडूवर खेळपट्टीचा मध्यभागी धाव घेतली, त्यानंतर अंपायरने दंड ठोठावला. मात्र, पाच धावांच्या शिक्षेनंतर वॉर्नरने या निर्णयाचा विरोध केल्याचे स्टम्प माइकमध्ये स्पष्टपणे ऐकू आले. त्याने अंपायर अलीम डार यांना विचारले की 'त्याने काय चूक केली आहे'. पाहा हा व्हिडिओ:

400 धावांची आघाडी मिळवल्यानंतर वॉर्नर आणि लाबूशेन फलंदाजी करत होते. एकीकडे वॉर्नरने दुसर्‍या डावात शतक ठोकले, तर लाबूशेन अर्धशतक करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने सिडनी टेस्टमध्ये न्यूझीलंडचा 279 धावांनी पराभव करून क्लीन-स्वीप केला.