Asia Cup 2020 Cancelled: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक 2020 रद्द; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची घोषणा
सौरव गांगुली File Image. (Photo Credits: Getty Images)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) मोठा फटका पुन्हा एकदा क्रिकेटला बसल्याचे पाहायला मिळाले आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात होणारा आशिया चषक 2020 स्पर्धाही (Asia Cup 2020) रद्द करण्यात आली असल्याची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) घोषणा केली आहे. एशियन क्रिकेट काउंसिल यांच्यात बैठक होणार आहे. याआधीच सौरभ गांगुलीने ही घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वात लोकप्रिय असणारी इंडियन प्रीमियर लीग 2020 सर्धा स्थगित करण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर- नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या आंतराष्ट्रीय टी-20 विश्वचषक स्पर्धेवरही अनिश्चिततेचे सावत आहे.

याबाबत गांगुलीने सांगितले की, " आशिया चषक स्पर्धा ही रद्द करण्यात येत आहे. कारण सध्याच्या घडीला कोणतीच तयारी आम्ही सुरु केलेली नाही. सरकारच्या नियमांनुसारच आम्ही क्रिकेटच्या तयारीला लागणार आहोत. त्यामुळे भारताची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका कधी खेळवण्यात येईल, हे अजूनही माहिती नाही. आम्हाला खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही मैदानात उतरण्याची कोणतीही घाई करणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि त्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत. हे देखील वाचा- Sourav Ganguly Test Team: सध्याच्या भारतीय टीममधील 'या' 5 खेळाडूंची सौरव गांगुलीने त्याच्या टेस्ट संघात केली निवड, मयंक अग्रवालसोबत मुलाखतीत केला खुलासा

आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यात आली तर आयपीएलचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. त्यामुळे आता आतंराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाबद्दल नेमका काय निर्णय घेते? यावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे.