सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा भारतीय क्रिकेट (Indian Cricket) इतिहासातील सर्वात प्रभावशाली कर्णधार होता. बुधवारी 48 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या गांगुलीने आपल्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलली. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, जावळल श्रीनाथ, अनिल कुंबळे आणि झहीर खान सारखे खेळाडू मिळाले. 2003 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठली आणि त्यांनी जगातील सर्व प्रमुख संघांविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्या. गांगुलीच्या नेतृत्वात कसोटी संघाने ऑस्ट्रेलियाला घरच्या व परदेशी सामन्यांमध्ये पराभव केलेली भारतीय टीम आजही देशाचा गौरव आहे. 2018-19 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिली कसोटी मालिका जिंकली आणि असे करणारा पहिला आशियाई देश बनला आहे. पण, गांगुलीला सध्याच्या कसोटी संघातून पाच क्रिकेटपटूंना आपल्या संघात निवडण्याची संधी मिळाली तर तो कोण निवडेल? (सचिन तेंडुलकरने नेहमी पहिला बॉल खेळण्यास सौरव गांगुलीला भाग पाडले? माजी कर्णधाराने सांगितलेला धमाल किस्सा ऐकून तुम्हीही नक्कीच हसाल Watch Video)
मयंक अग्रवालबरोबर (Mayank Agarwal) एका मुलाखतीत गांगुलीने या प्रश्नाचे उत्तर दिले. “प्रत्येक पिढीतील खेळाडू वेगवेगळे असल्याने हा एक कठीण प्रश्न आहे. तुमच्या सध्याच्या संघात मला विराट कोहली आणि रोहित शर्माची साथ असणे आवडले असते. वीरेंद्र सेहवाग असल्याने मी तुला (मयंक) निवडणार नाही. दुसर्या टोकाला झहीर असल्याने मी बुमराहची निवड कारेन. जवागल श्रीनाथ निवृत्त झाल्यानंतर मी मोहम्मद शमीलाही निवडेन. माझ्याकडे हरभजन आणि अनिल कुंबळे होते. त्यामुळे मी अश्विनला तिसरा फिरकीपटू म्हणून निवडेन. मला रवींद्र जडेजादेखील घेण्याचा मोह होईल,” ‘ओपन नेट्स विथ मयंक’ या मालिकेच्या ताज्या मालिकेत भारताचे माजी कर्णधार मयांकला म्हणाले.
गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2003 वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली पण अंतिम संघर्षात ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल फेरीत प्रवेश केला परंतु बाद फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले.