(Photo Credit: @cricketaakash/Twitter)

टिकटॉकवर दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होतात. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा देखील व्हिडिओ टिकटॉकवर काही दिवसांपूर्वी व्हायरल होत होता. आणि आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाष्यकार आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी त्यांची पत्नी आकाशी (Aakashi) सोबतचा टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ टिकटोकवर बर्‍यापैकी ट्रेंट होत आहे. आकाश टिक टॉकवर खूप अ‍ॅक्टिव्ह राहतात. या व्हिडिओमध्ये आकाशी आणि त्याची पत्नी आकाशीसह एक खास अंदाजात टिकटॉक विडिओ बनवला. (एमएसके प्रसाद यांचा खळबळजनक खुलासा, या कारणामुळे नाही झाली महान फील्डर जॉन्टी रोड्स यांची निवड)

आकाशने व्हिडिओ शेअर करत कॅप्शन देत लिहिले की, "मजा...हास्य... मस्ती. #श्रीमतीआणिश्रीचोपडा." या व्हिडिओमध्ये आकाश आणि आकाशी मेगास्टार अमिताभ बच्चन याचा प्रसिद्ध टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' च्या खास अंदाजांत बनवला आहे. यामध्ये आकाशी माजी क्रिकेटपटूला टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला आहे असा प्रश्न विचारत आहे. यावर आकाशने सांगितले की असे कधीच झाले नाही. पण, त्यानंतर आकाशी क्रिस गेल याच्याबद्दल त्याला सांगते. पहा हा व्हिडिओ:

दरम्यान, याआधी आकाशने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला होता. यात तो 'सारे जहां से अच्छा' हे गाणे गाताना दिसला. मागील काही दिवसांमध्ये आकाश काही विवादात अडकला होता. टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्यावर केलेल्या त्याच्या एका ट्विटमुळे तो जडेजाच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता.