भारतीय संघ (Indian Team) पिंक बॉलने डे-नाईट टेस्ट सामना खेळण्यास सज्ज आहे. टीम इंडिया आजपासून बांग्लादेश (Banglades) संघाविरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर पहिला पिंक बॉल टेस्ट सामना खेळणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार मोमिनुल हक याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या आणि अंतिम टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियाने मागील मॅचपासून प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही केला आहे. दुसरीकडे, दुसर्या कसोटीसाठी बांग्लादेशच्या प्लेयिंग एलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. अल अमीन हुसेन आणि नईम हसनिन यांचा समावेश करण्यात आला आहे. तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन यांना संघातून वगळण्यात आले आहेत. यापूर्वी झालेल्या सामन्यात (इंदोर) टीम इंडियाने बांग्लादेशचा डाव आणि 130 धावांनी पराभव केला होता. आणि आता कोलकातामधील सामना जिंकत भारतीय संघ 2 सामन्यांच्या मालिकेत क्लीन-स्वीप करण्याच्या निर्धारित असेल. (IND vs BAN Day/Night Test: विराट कोहली याच्याकडे विश्वविक्रम नोंदवण्याची संधी, कोणताही भारतीय कर्णधार नाही करू शकला 'ही' कामगिरी)
असा आहे भारत आणि बांग्लादेशचा प्लेयिंग इलेव्हन:
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, आणि उमेश यादव.
बांग्लादेश: मोमिनुल हक (कॅप्टन), इमरुल कायस, शादमान इस्लाम, मोहम्मद मिथुन, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह, लिटन दास (विकेटकीपर), अल अमीन हुसेन, मुस्ताफिजुर रहमान, अबू जयाद, नईम हसनिन.