भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू (Women's Cricketer) झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) जगातील सर्वोत्तम महिला वेगवान गोलंदाज आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांचे एक वेगळे स्थान आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये झालेले बदल त्यांनी अगदी जवळून पाहिले आहे. आणि आता तिच्या आयुष्यावर लवकरच एक बायोपिक बनणार आहे. खेळाडूंवर बायोपिक बनणे हा आता एक ट्रेंडच बनला आहे. आणि बॉलिवूड तिचा खेळ आणि आयुष्य लोकांपर्यंत पोहचवण्याच्या तयारीत आहे आणि म्हणूनच तिची बायोपिक बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवाय, भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिची भूमिका मोठ्या पद्यावर निभावणार आहे. अनुष्का काही काळ मोठ्या पडद्यावरुन गायब होती. अशा परिस्थितीत तिचे चाहते तिची आठवण काढत होते आणि म्हणूनच आता झुलनच्या अबायोपिकच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा मोठ्या पद्यावर तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अनुष्का सध्या या भूमिकेसाठी तयारी करत आहे आणि यामुळे क्रिकेटचे प्रशिक्षणही घेत आहे. (T20 विश्वचषक 2020 स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा; 15 वर्षीय शेफाली वर्माला संधी, पहा संपूर्ण यादी)
एक्स्ट्रा टाइमच्या अहवालानुसार भारतीय क्रिकेटपटू जेमीमह रॉड्रिग्जचे वडील इव्हान रॉड्रिग्ज आणि भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी यांच्याकडून अनुष्का प्रशिक्षण घेत असल्याचे समजले जात आहे. या बायोपिकबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नसली तरीही सोशल मीडियावर अनुष्काचे प्रशिक्षण घेतानाचे फोटोज व्हायरल होत आहे. हे फोटोज पाहून अनुष्का आणि झुलनमधील साम्य तुम्हालाही आश्चर्यचकित करेल. पाहा हे फोटोज:
37 वर्षीय झुलनने 2002 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ती भारताच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक बनली. तिने भारताकडून 10 टेस्ट, 182 वनडे आणि 68 टी-20 सामन्यात 321 विकेट घेतले आहेत. झुलन ही महिला वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. बॉलिवूडने आजवर बर्याच खेळाडूंवर बायोपिक बनवली आहे, ज्या हिट ठरल्या आहेत. एमएस धोनी, मेरी कॉम, मिल्खा सिंह यांसारख्या खेळाडूंवरील बायोपिकला चाहत्यांकडून पसंती मिळाली आहे.