Wrestling Championships 2023: अंतीम पंघलने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकला
antim panghal

Wrestling Championships 2023: युवा भारतीय कुस्तीपटू जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2023 मध्ये अंतीम पंघलने महिलांच्या 53 किलो वजनी गटात विजय मिळवला आहे. तसेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा जिंकला आहे. पॅरिस 2024 कडे जाणारा हा देशाचा कुस्तीमधील पहिला कोटा आहे. पदक जिंकल्यामुळे पंघल ही आठवी भारतीय महिला आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी एकूण 23 वी महिला ठरली आहे.