India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard:  भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवाच झाली आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याला सकाळी 10.00 वाजता सुरुवात होईल. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकर संपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघाने 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मुशफिकुर रहीम (6), मोमिनुल हक (40) धावा करून नाबाद आहेत. दरम्यान, कानपूरमध्ये पावासाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पावसामुळे हैराण झालेली टीम इंडिया हॉटेलमध्ये परतली आहे. यावरून असा अंदाज बांधता येईल की आजचा सामना होणे कठीण आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)