Zee News च्या दाव्यानुसार, पाकिस्तान आणि बांग्लादेश मधून सायबर क्रिमिनल्सनी त्यांचं सर्वर हॅक केले आहे. झी न्यूजने वृत्त दिले आहे की त्यांचे मुख्य चॅनेल हॅक करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. मीडिया आउटलेटने म्हटले आहे की त्यांचे झी न्यूज बिहार-झारखंड चॅनेल हॅक करण्यात आले आहे. लाईव्ह टीव्ही फीड काही काळासाठी विस्कळीत झाले होते, तरीही चॅनेलने त्यांच्या YouTube प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारण सुरू ठेवले. पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत झी न्यूजच्या प्रसारणावर बंदी घातल्यानंतर लगेचच हा प्रकार घडला आहे.

Zee News हॅक?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)