IND vs SA 2nd Test: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स मैदानावर खेळला गेला. दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दुसरी कसोटी दोन दिवसांत संपली. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात केवळ 55 धावांवरच गारद झाला होता. त्याचवेळी, पहिल्या डावात टीम इंडिया 34.5 षटकात 153 धावा करत सर्वबाद झाली होती. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 36.5 षटकांत केवळ 176 धावा करून अपयशी ठरला. दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 12 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. हा सामना कसोटी इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना ठरला आहे. दोन दिवस चाललेल्या या कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या 642 चेंडूत लागला. (हे देखील वाचा: Rohit Sharma Uses Cuss Word: केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने वापरले अपशब्द, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
The second match between India and South Africa turns out to be shortest ever in history of Test cricket
— Press Trust of India (@PTI_News) January 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)