South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर (गुरुवार) पासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान प्रथम फलंदाजी करेल. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 28 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खूपच प्रभावी ठरली आहे. या 28 सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने 15, तर पाकिस्तानने केवळ 6 सामने जिंकले आहेत. 7 सामने अनिर्णित राहिले. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेचे पाकिस्तानवर वर्चस्व आहे. यासह देशांतर्गत परिस्थितीचा फायदा दक्षिण आफ्रिकेला आणखी मजबूत बनवतो.

येथे पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन 

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ: टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन.

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ: शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, सलमान आगा, आमेर जमाल, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)