DC W vs UPW W, 8th Match Live Toss & Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

दोन्ही संघांमध्ये अनेक नवीन बदल झाले आहेत, ज्यामुळे सामना अधिक रोमांचक होऊ शकतो. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मेग लॅनिंग करत आहे. तर, यूपी वॉरियर्सची कमान दीप्ती शर्माच्या खांद्यावर आहे. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

DC W vs UPW W, 8th Match Live Toss & Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
DC vs UP (Photo Credit - X)

Delhi Capitals Women (WPL) vs UP Warriorz Women (WPL), WPL 2025 8th Match Live Toss & Scorecard: महिला प्रीमियर लीग 2025 चा कारवां बेंगळुरूला पोहोचला आहे. या लीगमध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या लीगमध्ये पाच संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील आठवा सामना आज म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स महिला आणि यूपी वॉरियर्स महिला यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक नवीन बदल झाले आहेत, ज्यामुळे सामना अधिक रोमांचक होऊ शकतो. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मेग लॅनिंग करत आहे. तर, यूपी वॉरियर्सची कमान दीप्ती शर्माच्या खांद्यावर आहे. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

दिल्ली कॅपिटल्स: शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, निक्की प्रसाद.

यूपी वॉरियर्स: किरण नवगिरे, वृंदा दिनेश, दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, श्वेता सहरावत, ग्रेस हॅरिस, चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, उमा छेत्री (विकेटकीपर), क्रांती गौड, साईमा ठाकोर.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2025 07:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).