Karachi Kings vs Lahore Qalandars, 6th Match: पाकिस्तान सुपर लीग 2025 चा (Pakistan Super League 2025) सहावा सामना कराची किंग्ज विरुद्ध लाहोर कलंदर्स (KK vs LQ) यांच्यात कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. लाहोर कलंदर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज आणि लाहोर कलंदर्स यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये कराची किंग्जने 13 वेळा विजय मिळवत आघाडी घेतली आहे, तर लाहोर कलंदर्सला फक्त 6 सामने जिंकता आले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमधील कोणताही सामना अनिर्णीत राहिलेला नाही. तुम्ही या सामन्याचे लाईव्ह स्कोरकार्ड येथे पाहू शकतात.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
कराची किंग्स: टीम सेफर्ट (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जेम्स विन्स, शान मसूद, अराफत मिन्हास, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, खुशदिल शाह, ॲडम मिलने, हसन अली, फवाद अली
लाहोर कलंदरः फखर जमान, मोहम्मद नईम, अब्दुल्ला शफीक, डॅरिल मिशेल, सिकंदर रझा, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी (कर्णधार), रिशाद हुसेन, जमान खान, हरिस रौफ, आसिफ आफ्रिदी
कराची किंग्ज विरुद्ध लाहोर कलंदर्स सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड:
It's the El-Classico of Pakistan Super League 🔥.
Lahore Qalandars have won the toss and elected to batting first in this mega encounter.#KKvLQ | #HBLPSLX | #ApnaXHai | #Cricket | #GreenTeam | #OurGameOurPassion | #KhelKaJunoon | #PSL2025 pic.twitter.com/aVUjAsH8Ci
— Green Team (@GreenTeam1992) April 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)