Rohit Sharma Viral Video: भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सात गडी राखून (India Beat South Africa) जिंकला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिका 174/9 वर झुंजत असताना, मोहम्मद सिराजचा चेंडू नांद्रे बर्जरच्या पॅडवरून बाऊन्स झाला आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगवर रोहित शर्मापर्यंत पोहोचला. रोहित शर्माला डीआरएस घ्यावा की नाही याविषयी शंका असल्याने त्याने डीआरएस घेत असल्याचे सांगण्याआधी एक खुलासा केला कारण अजून तीन बाकी आहेत. स्टंप माइकवरून चाहत्यांनी ते ऐकले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. (हे देखील वाचा: ICC New Stumping Rule: आयसीसीने स्टंपिंगच्या नियमात केला मोठा बदल, डीआरएसच्या गैरवापरावर घालण्यात येणार बंदी)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)