IND vs SA 2nd Test: भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सात गडी राखून (India Beat South Africa) जिंकला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 55 धावांत गारद झाला. त्यानंतर भारत 153 धावांवर ऑलआऊट झाला. यजमानांनी दुसऱ्या डावात 173 धावा केल्या. त्यामुळे भारताला 79 धावांचे लक्ष्य मिळाले. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर एडन मार्करामने सर्वाधिक 106 धावा केल्या. टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 बळी घेतले. टीम इंडियाला दुसरी टेस्ट जिंकण्यासाठी 79 धावा करायच्या होत्या. दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 12 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.
Star Sports वर विजयी शॉट पहा
And that's THAT! The shortest ever Test with a result goes India's way!#TeamIndia win a historic Test by 7 wickets, their 1st ever Test victory at Cape Town!
The series finishes level at 1-1!#Cricket #SAvIND pic.twitter.com/exZ5epE2RA— Star Sports (@StarSportsIndia) January 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)