World Test Championship Points Table 2023-25: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) आज इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने पराभव (IND Beat SA) केला आहे. भारतीय संघाने 1992 मध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता, तेव्हापासून भारतीय संघ केपटाऊनमध्ये (Cape Town) एकही सामना जिंकू शकला नव्हता. पण जे आजवर घडले नव्हते ते आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली घडले आहे. दरम्यान, या विजयासह भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Point Table) म्हणजेच डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्येही पहिल्या स्थानी मोठी झेप घेतली आहे. गेल्या सामन्यातील पराभवानंतर संघ बराच खाली आला होता, मात्र आता टीम इंडियाने या मोठ्या विजयाने पाकिस्तानला मागे टाकले आहे. (हे देखील वाचा: Cape Town कसोटीमध्ये Virat kohli आणि Shubman Gill यांनी घेतला फुगडी खेळण्याचा आनंद! Video झाला व्हायरल)
पाहा पॉइंट टेबलची परिस्थिती
India number 1 in World Test Championship 2023-25 cycle after today's victory.
As you all are aware , WTC considers percentage of points won out of total points possible to win .
Focus on the column PCT and explanation at bottom of points table below #INDvSA #SAvIND pic.twitter.com/SLnM45ThfP
— CricInformer (@CricInformer) January 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)