IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये (Cape Town) भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले आहे. सेंच्युरियनमध्ये ब्लू संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. केपटाऊनमध्ये यजमान संघाचा सात गडी राखून पराभव करत रोहित आणि कंपनीने गुणसंख्या बरोबरी केली आहे. विराट कोहली (Virat Kohli त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या कृती आणि प्रतिक्रियांमुळेही चर्चेत असतो. आता शुभमन गिलसोबतचा (Shubman Gill) त्याचा फुगडी खेळताना चर्चेत आला आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो लहानपणीचा खेळ खेळताना दिसत आहे. (हे देखील वाचा: India Beat South Africa: टीम इंडियाने 31 वर्षांचा दुष्काळ संपवला, केपटाऊनमध्ये नोंदवला ऐतिहासिक विजय)
पाहा व्हिडिओ
Virat Kohli and Shubman Gill 😂❤️ pic.twitter.com/Zd4rbSWaE3
— Shubman Gang (@ShubmanGang) January 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)